तरुण भारत

उत्तराखंडात मागील 24 तासात ‘या’ वर्षातील सर्वाधिक रुग्णांची नोंद

  • 1600 पेक्षा अधिक रुग्णांवर उपचार सुरु 


ऑनलाईन टीम / देहरादून : 


उत्तराखंडात पुन्हा एकदा कोरोना बाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. रविवारी या वर्षातील सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली. मागील 24 तासात 366 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले. तर ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या 1600 पेक्षा अधिक आहे. त्यामुळे प्रदेशात एकूण रुग्णांची संख्या 99,881 इतकी झाली आहे. 

Advertisements

दरम्यान, रुग्ण वाढीच्या मानाने रुग्ण कमी होण्याचे प्रमाण कमी आहे. कालच्या दिवसात केवळ 42 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. रविवारी 7627 नमुने निगेटिव्ह आले आहेत. काल देहरादून जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजेच 167 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर हरिद्वारमध्ये 59, नैनिताल 31, पौडीमध्ये 17,  उधमसिंह नगर 20, टिहरी 54 अल्मोडा आणि पिथोरागडमध्ये प्रत्येकी तीन – तीन, बागेश्वर 2, रुद्रप्रयाग 4, उत्तरकाशीमध्ये 6 तर  चमेली आणि चंपावतमध्ये एकही रुग्ण आढळून आलेला नाही. 


सद्य स्थितीत 1660 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर एकूण 95,025 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले. दरम्यान, प्रदेशात आतापर्यंत 1709 (1.71 %) रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. सद्य स्थितीत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.14 % इतके आहे. 

Related Stories

लडाख दौऱ्यावर पोहोचले संरक्षणमंत्री

Patil_p

झारखंडमध्ये पेट्रोल 25 रुपयांनी स्वस्त होणार

Patil_p

गुरुवारी राज्यभरात ‘मास्क डे’

Patil_p

मिस युनिव्हर्स हरनाझ संधूने व्यक्त केली इच्छा, म्हणाली …

Sumit Tambekar

अमित खरे पंतप्रधान मोदींचे नवे सल्लागार

Patil_p

काश्मीरमधील त्रालमध्ये दहशतवाद्यांनी केला बॉम्ब हल्ला; 8 जण जखमी

Rohan_P
error: Content is protected !!