तरुण भारत

कोल्हापूर : गडमुडशिंगी येथे एकाचा संशयास्पद मृत्यू ?

वार्ताहर / उचगाव

करवीर तालुक्यातील गडमुडशिंगी येथे एकाचा मृतदेह आढळुन आला. निलेश अंतु माळगे वय ४५ असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. ही घटना सोमवारी सकाळी गडमुडशिंगीतील मराठा चौक येथील एका मंडळाच्या खोलीत उघडकीस आली. हा घातपात आहे की अपघात हे मात्र अद्याप निष्पण झालेल नाही.

Advertisements

गडमुडशिंगी येथील निलेश हा सेंट्रींग व्यवसाय करत होता. निलेश, पत्नी आणि दोन मुलासह स्मशानभुमी नजीकच्या परिसरात राहत होते. त्याला दारुचे व्यसन होते. शनिवारी दुपारी जेवण करुन तो घरातुन बाहेर पडला. गडमुडशिंगीतील मराठा चौकात एका मंडळाच्या खोलीचं बांधकाम सुरु आहे. एका व्यक्तीचा मृतदेह त्या ठिकाणी पडलेला काहींना आढळला. त्या मृतदेहाला मुंग्या लागल्या होत्या. तर तोंडातून मोठ्याप्रमाणात रक्तस्ञाव झाल्याचे दिसून आले.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. हा मृतदेह निलेश माळगे याचा असल्याचे ओळख पटली. शनिवार, रविवार असे दोन दिवस माळगे कुटुंब निलेशचा शोध घेत होते पण तो सापडला नाही. हा अपघात आहे की संशयास्पद मृत्यू याचा पोलीस शोध घेत आहेत. रुग्णवाहिकेतुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सीपीआर रुग्णालयात पाठवण्यात आला. शवविच्छेदनानंतर व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे. या घटनेची नोंद गांधीनगर पोलीसात झाली असून अधिक तपास स.पो.नि. दिपक भांडवलकर करीत आहेत.

Related Stories

मिरज-कोल्हापूर रेल्वे वाहतूक पुन्हा बंद

Abhijeet Shinde

कोल्हापूर : कुंभोज येथील वारणा पूल अत्यावश्यक वाहतुकीसाठी खुला

Abhijeet Shinde

कोल्हापूर जिल्हय़ात 17 पॉझिटिव्ह, कोरोनाचा चौथा बळी

Abhijeet Shinde

‘कोल्हापूर द्राक्ष महोत्सव 2021’ चे उद्घाटन, जंबो सिडलेस द्राक्षे खास आकर्षण

Abhijeet Shinde

हायमास्ट पथदिव्यांसाठी विजपुरवठा करा, अन्यथा उपोषण : जि.प.सदस्या मनिषा कुरणे

Abhijeet Shinde

कोल्हापूर जिल्ह्यात 67 नवे रूग्ण, 78 कोरोनामुक्त

Abhijeet Shinde
error: Content is protected !!