तरुण भारत

टाटा मोटर्सचा स्टेट बँकेबरोबर करार

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

लहान आणि हलक्या व्यावसायिक वाहनांच्या खरेदीकरीता ग्राहकांना कर्ज घेता यावे यासाठी टाटा मोटर्सने स्टेट बँक ऑफ इंडियाशी 3 वर्षासाठी सहकार्याचा करार केला आहे. या अंतर्गत खरेदीदारांना टाटा मोटर्सचे व्यावसायिक वाहन खरेदी करायचे असेल तर स्टेट बँकेकडून कर्ज घेता येणार आहे.

Advertisements

ग्राहकांना कोणत्याही त्रासाशिवाय सदरचे कर्ज देण्यासाठी स्टेट बँकेचे प्रयत्न असणार आहेत. कर्जाची योजना सुटसुटीत करण्यात आली असून ग्राहकांकरीता परतफेडीचे हफ्तेही सोयीस्कर केले आहेत. टाटा मोटर्सने कर्ज देण्यासाठी स्टेट बँकेबरोबर 3 वर्षाचा करार केला आहे. स्टेट बँकेच्या 22 हजारहून अधिक शाखांच्या मार्फत व्यावसायिक वाहनांकरीता कर्ज घेता येणे ग्राहकांना शक्य होणार आहे. विस्तारलेल्या बँक शाखांच्या माध्यमातून व्यावसायिक वाहनांच्या विक्रीकरीता टाटा मोटर्स येणाऱया काळात जोमाने प्रयत्न करणार आहे. बाजारातील आपला वाटा अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने टाटा मोटर्सचे प्रयत्न राहणार आहेत.

Related Stories

झोमॅटो आयपीओ आणण्याच्या तयारीत

Patil_p

देशामध्ये सोन्याची मागणी 70 टक्क्मयांनी घसरली

Patil_p

पुढच्या तिमाहीत पोलादाची मागणी वाढणार

Amit Kulkarni

बेजोस लवकरच सीईओ पद सोडण्याचे संकेत

Patil_p

ऍमेझॉनवर ‘फेमा’ नियम उल्लंघनाचा आरोप

Patil_p

सोन्याच्या दरात 2600 रुपयांची घसरण

tarunbharat
error: Content is protected !!