तरुण भारत

जेएसडब्ल्यूने ठरवले नवे उद्दीष्ट

नवी दिल्ली

 पोलाद निर्मिती क्षेत्रातील मोठी कंपनी जेएसडब्ल्यू स्टीलने 2030 पर्यंत वार्षिक 45 दशलक्ष टन इतकी पोलाद उत्पादनाची क्षमता करण्याचे उद्दीष्ट समोर ठेवले आहे. भूषण पॉवर अँड स्टील लिमिटेड यांचे अधिग्रहण केल्यानंतर जेएसडब्ल्यूला वरील प्रमाणे उद्दिष्ट साध्य करणे शक्य होणार असल्याचे जेएसडब्ल्यू ग्रुपचे चेअरमन सज्जन जिंदाल यांनी म्हटले आहे. दोघांच्या एकत्रित कार्यप्रणालीतून वर्षाला 45 दशलक्ष टन इतक्या पोलादाची निर्मिती करणे नक्कीच शक्य होणार आहे. त्या दृष्टीने कंपनी आपली रणनिती येणाऱया दिवसात आखणार आहे. अलीकडेच जेएसडब्ल्यूने भूषण पॉवर अँड स्टीलचे अधिग्रहण केले आहे. इतिहासात पाहता जेएसडब्लूने केलेले हे अधिग्रहण तसे मोठे आणि नोंदणीय असेच म्हणावे लागेल. या अधिग्रहणामुळे कंपनीची परिस्थिती अधिक बळकट होणार असून उत्पादन वाढीचे उद्दीष्ट साध्य करणे शक्य होणार आहे.

Advertisements

Related Stories

एसबीआय जनरल इन्शुरन्सकडून शगुन गिफ्ट इन पॉलिसी सादर

Patil_p

भारतामध्ये सोन्याची मागणी वाढली

Amit Kulkarni

ईपीएफओने 94.41 लाख दावे काढले निकालात

Patil_p

पार्लेजी बिस्कीटांची रेकॉर्डब्रेक विक्री

Patil_p

जागतिक संकेतामुळे सेन्सेक्स सावरला

Amit Kulkarni

एअर इंडिया विक्रीच्या निविदा सादरीकरणास मुदत वाढ

tarunbharat
error: Content is protected !!