तरुण भारत

भाजप कार्यकर्त्याच्या आईचा ‘मारहाणी’मुळे मृत्यू

तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर आरोप

कोलकाता / वृत्तसंस्था

Advertisements

पश्चिम बंगालच्या निवडणुकीदरम्यान उत्तर 24 परगणा येथे भाजपच्या एका कार्यकर्त्याच्या वृद्ध आईचे निधन झाले आहे. मृत्युमुखी पडलेल्या शोवा मजूमदार यांचे वय 85 वर्षे होते. एक महिन्यापूर्वीच त्यांच्या घरावर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात शोवा मजूमदार जखमी झाल्या होत्या. शोवा यांच्या मृत्यूनंतर पश्चिम बंगालमध्ये भाजप ममतांच्या विरोधात अधिकच आक्रमक झाला आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मजूमदार कुटुंबीयांचे सांत्वन केले आहे. शोवा मजूमदार यांच्या कुटुंबाच्या वेदना आणि घाव दीर्घकाळापर्यंत ममता बॅनर्जींना त्रस्त करत राहतील. बंगाल हिंसामुक्त आणि महिलांसाठी सुरक्षित करावा लागणार असल्याचे शाह यांनी म्हटले आहे. तर तृणमूलचे ज्येष्ठ खासदार सौगत रॉय यांनी भाजपचा आरोप फेटाळला आहे. गोपाळ मजूमदारचे त्याच्या घरासमोरच तृणमूल कार्यकर्त्यासोबत भांडण झाले होते. यादरम्यान गोपाळ खाली पडला, जे पाहून त्याच्या आईला स्वतःच्या मुलावर हल्ला झाल्याचे वाटले, ती रागात वेगाने धावत येत असताना खाली पडली होती असा दावा सौगत यांनी केला आहे. अनेक आजारांनी पीडित 85 वर्षीय महिलेचे सोमवारी निधन झाले आहे. त्यांच्या निधनाचे मला दुःख आहे, पण याचे तृणमूल काँग्रेसचे कुठलेच देणेघेणे नसल्याचे सौगत रॉय म्हणाले.

उत्तर दमदम भागात 27 फेब्रुवारी रोजी तृणूमल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला तसेच माझ्या मुलाला मारहाण केल्याचा दावा शोवा मजुमदार यांनी केला होता. मारहाणीमुळे सुजलेला तसेच काळा पडलेला शोवा यांचा चेहरा पाहून भाजपने संताप व्यक्त केला होता.

Related Stories

आंध्रप्रदेशात मारले गेले 6 नक्षलवादी

Patil_p

इचलकरंजीत आज ६ जण कोरोना पॉझिटिव्ह

triratna

मनोज सिन्हा जम्मू काश्मीरचे नवे उपराज्यपाल

Rohan_P

‘खेळणी’च मुलांचा पहिला सवंगडी

Amit Kulkarni

संयुक्‍तराष्ट्रांच्या हेलिकॉप्टरवर जिहादींचा हल्ला, दोघांचा मृत्यू

datta jadhav

‘टीम वाजपेयी’चे केवळ 4 सदस्य राहिले मंत्रिमंडळात

Amit Kulkarni
error: Content is protected !!