तरुण भारत

विधानसभा अधिवेशन त्वरित आटोपते घ्यावे

विरोधकांची सभापती पाटणेकरांकडे मागणी,आज सभापतींना भेटणार : दिगंबर कामत

प्रतिनिधी / पणजी

Advertisements

राज्य विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या गुंडाळून ते नंतर घेण्यात यावे.  तत्पूर्वी बुधवारपर्यंत पुढील 3 महिन्यांकरीता लेखानुदान मागण्या मान्यतेस घेण्यात याव्यात, अशी मागणी पुन्हा जोर धरु लागली आहे. आज या अनुषंगाने विरोधी पक्षांचे आमदार सभापती राजेश पाटणेकर यांना भेटण्याची शक्यता आहे.

विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी या संदर्भात सांगितले की, कामकाज सल्लागार मंडळाच्या बैठकीत आम्ही चार आमदारांनी सभापतींना लेखी पत्र दिले होते. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर लेखानुदान घ्या आणि अधिवेशन तात्पुरते स्थगित ठेवून नंतर काही महिन्यांनी घ्या, असे कळविले होते. उद्देश होता 5 पालिका निवडणुकीतील आचारसंहिता. आता तर कोविड रुग्णांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत आहे. अशावेळी अधिवेशनाचे कामकाज चालविणे फार जिकीरीचे झालेले आहे. आपण सभापती राजेश पाटणेकर यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. पाटणेकर यांनी उद्या दुपारी भोजनानंतर एकत्रित बसून त्यावर चर्चा करु, असे सांगितले आहे.

त्यामुळेच आज दुपारी आम्ही सभापतींना भेटून त्यांच्याशी चर्चा करु आणि या प्रश्नी तोडगा काढला जाईल. कोविड रुग्णांची वाढती संख्या भायनक परिस्थिती निर्माण करणारी आहे, असे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत म्हणाले.

Related Stories

गिरी येथे 13.62 लाखाचा ड्रग्स जप्त

Amit Kulkarni

भाजीमाल वाहतूकीच्या बनावटगिरीतील “मास्टरमाइंड” कोण ?

Omkar B

ढवळी येथे दिवाळी बाजाराचे उद्घाटन

Amit Kulkarni

राज्यात पेट्रोल रु.1.30 तर डिझेल 60 पैशांनी महागले

Amit Kulkarni

बांदोडा पंचायतीतर्फे शिवजयंती साजरी

Amit Kulkarni

पशुखाद्य दरवाढीप्रकरणी दुध उत्पादकांचे आंदोलनास्त्र

Patil_p
error: Content is protected !!