तरुण भारत

भाजप उमेदवाराला अनुकूल वातावरण

जगदीश शेट्टर यांची पत्रकार परिषद

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

भाजपच्या कार्यकर्त्यांनी बुथनिहाय आतापर्यंत काम केले आहे. दिवंगत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व खासदार सुरेश अंगडी यांनी बेळगावसह कर्नाटकमध्ये कामे केली आहेत. जनतेचा त्यांच्यावर विश्वास आहे. आता त्यांच्या पत्नी मंगला अंगडी यांनाही अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे आम्हाला त्याचा निश्चितच फायदा होणार असल्याचे मंत्री जगदीश शेट्टर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची नेतेमंडळी बेळगावात दाखल झाली आहेत. एका हॉटेलमध्ये पत्रकार परिषदेवेळी पक्षाच्या कार्याची माहिती त्यांनी दिली. बेळगाव, धारवाड रेल्वेमार्ग व्हावा यासाठी सुरेश अंगडी यांनी पाठपुरावा केल्यामुळेच हा रेल्वेमार्ग होत आहे. इतर भागातही त्यांनी काम केले आहे. बेळगावची जनता कधीच त्यांना विसरणार नाही. भाजपने तळागाळापर्यंत काम केले आहे, त्याचा फायदा या निवडणुकीत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी बेळगाव जिल्हा ग्रामीण अध्यक्ष संजय पाटील, आमदार अनिल बेनके, राजेंद्र हरकुनी,ऍड. एम. बी. जिरली यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री आज बेळगावात मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा हे मंगळवारी बेळगावमध्ये दाखल होणार आहेत. भाजप उमेदवार मंगला अंगडी यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ते बेळगावला येत आहेत. काँग्रेसने उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर भाजप उमेदवाराचाही अर्ज दाखल होणार असल्याने मुख्यमंत्र्यांसह नेते मंडळी बेळगावात येत आहे.

Related Stories

खानापुरात ख्रिसमस अत्यंत साधेपणाने साजरा

Omkar B

आमदार अनिल बेनकेंकडून विविध विकासकामांना चालना

Patil_p

शारदोत्सव महिला सोसायटीतर्फे बौध्दिक स्पर्धा

Patil_p

ग्रा.पं.कामगार अडचणीत.. अधिकारी मात्र जोमात

Amit Kulkarni

सियाचीन ऑक्सिजन प्लांटबाबत सुमेधा चिथडे यांचे व्याख्यान

Amit Kulkarni

कर्नाटक: आरोग्य विभागाच्या कार्यालयातील वाहन चालकाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde
error: Content is protected !!