तरुण भारत

लक्षण दिसत नसल्यामुळे

अनेक विकारांची लक्षणं सुरूवातीच्या टप्प्यात दिसून येत नाहीत. हे विकार अखेरच्या टप्प्यात पोहोचल्यानंतर ही लक्षणं दिसू लागतात. काही विकारांची लक्षणं फार सौम्य असतात. त्यामुळे एखादा विकार जडला आहे हे पटकन लक्षात येत नाही. उच्च रक्तदाब, मधुमेह, स्लीप ऍप्निया काचबिंदू आणि पॉलिसिस्टिक ओव्हरीयन सिंड्रोम(पीसीओएस) च्या बाबतीत असं घडू शकतं. लक्षणं न दाखवणार्या या विकारांविषयी…

उच्च रक्तदाब

अर्ध्यापेक्षा जास्त लोकांना उच्च रक्तदाब जडल्याची माहितीच नसते. या विकाराची सुरूवातीला फारशी लक्षणं दिसून येत नाहीत. योग्य काळजीअभावी उच्च रक्तदाब रौद्ररूप धारण करू शकतो. ह्दयविकार, स्ट्रोक किंवा असाच एखादा जीवघेणा प्रकार घडल्यानंतर उच्च रक्तदाबाचं निदान होतं. उच्च रक्तदाबामुळे रक्तवाहिन्यांचं न भरून येणारं नुकसान होतं. उच्च रक्तदाबाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी नियमित आरोग्य तपासणी करून घेणं गरजेचं आहे. वेळेत निदान झाल्यास उच्च रक्तदाबावर नियंत्रण ठेवता येतं.

मधुमेह

प्राथमिक टप्प्यात मधुमेहाची फारशी लक्षणं दिसून येत नाहीत. रक्तातल्या साखरेच्या प्रमाणात चढ-उतार असले तरी काही लक्षणं न जाणवल्याने काळजी घेतली जात नाही. खूप तहान लागणं, तोंड सुकणं, अंधूक दिसणं, वरचेवर लघवीला लागणं अशी अत्यंत सौम्य लक्षणं सुरूवातीला दिसून येतात. पण याकडे दुर्लक्षच केलं जातं. त्यामुळे मधुमेहाची नियमित चाचणी करून घ्यायला हवी.

काचबिंदू

काचबिंदूची लक्षणं सुरूवातीला दिसून येत नाहीत. यात काचबिंदूमध्ये डोळ्याच्या मुख्य रक्तवाहिनीला धोका पोहोचतो. हा विकार अखेरच्या टप्प्यात पोहोचेपर्यंत दृष्टी कमी झाल्याचं लक्षात येत नाही. त्यामुळे काचबिंदू टाळण्यासाठी चाळीशीनंतर डोळ्यांची  नियमित तपासणी करून घ्यायला हवी.

स्लीप ऍप्निया

या विकारात झोपेत श्वसनक्रिया बंद पडते. स्थूल माणसांसोबतच 20 ते 70 वयोगटातल्या महिलांनाही ही समस्या उद्भवू शकते. सकाळी खूप झोप येणं, घोरणं, डोकेदुखी, सततचा कंटाळा, थकवा अशी या विकाराची लक्षणं असतात. पण त्याकडे दुर्लक्ष केलं जात. अशी लक्षणं दिसली तर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यायला  हवा.

पीसीओएस

प्रजननक्षम वयोगटातल्या 10 टक्के महिलांना पीसीओएसची समस्या असते. चेहर्यावरची लव आणि पाळीतली अनियमितता ही या विकाराची लक्षणं असतात. केस गळणं हे सुद्धा या विकाराचं लक्षण असतं. अशी लक्षणं दिसली की डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. जीवनशैलीतले बदल, नियमित व्यायाम, पौष्टिक आहार या माध्यमातून या विकारावर नियंत्रण ठेवता येतं.

Related Stories

हनुमानासन

Omkar B

नियमित व्यायाम करूनही

Amit Kulkarni

प्रदुषणानं घटतंय आयुर्मान

Omkar B

ब्रेन टय़ुमरची लक्षणे ओळख

tarunbharat

ऑक्सिजन आणि आरोग्य

Omkar B

आष्टवक्रासन

Omkar B
error: Content is protected !!