तरुण भारत

कोल्हापूर : २५ हजाराची लाच घेताना इंगळी तलाठ्यास अटक; कोल्हापूर लाचलुचपत विभागाची कारवाई

प्रतिनिधी / इचलकरंजी

हातकणंगले तालुक्यातील इंगळी येथील संतोष सुभाष उपाध्ये (रा. केडीसी बँक समोर, कुरुंदवाड) याला २५ हजाराची लाच घेताना कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या अधिकाऱ्यानी नाट्यमयरित्या पाठलाग करून, इचलकरंजी येथे मंगळवारी दुपारी पकडले.

Advertisements

लाचखोर तलाठी संतोष उपाध्ये याने तक्रारदाराकडे वीटभट्टीसाठी लागणाऱ्या माती उत्खलंन करणेकरिता रॉयल्टी भरून परवानगी देण्यासाठी प्रथम ३० हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती २५ हजार रुपयांची लाच स्विकारली. याच दरम्यान त्याला कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या अधिकाऱ्यानी पकडण्याचा प्रयत्न केला. पण तो लाचेची रक्कम घेवून पळून जाऊ लागला. यावेळी लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या अधिकाऱ्यानी त्याला पाठलाग करून लाचेच्या रक्कमेसह पकडले.

ही कारवाईत पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत, पोलीस निरीक्षक युवराज सरनोबत, सहाय्यक फौजदार संजीव बबंरगेकर, पोलीस नाईक सुनिल घोसाळकर, पोलीस नाईक कृष्णात पाटील, पोलीस कॉन्स्टेबल रूपेश माने आदींच्या पथकाने केली.

Related Stories

नाट्यकर्मींसाठी शासकीय विश्रामगृहात कक्ष आरक्षित

Abhijeet Shinde

कंदलगाव, नागांव मार्गावर धावणार केएमटी

Abhijeet Shinde

कागल पोलिस स्थानकात दोघांवर बलात्काराचा गुन्हा दाखल

Abhijeet Shinde

प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये देण्याचा मुहूर्त कधी ?

Abhijeet Shinde

कोल्हापूर : बांधकाम कामगारांना ३ हजार रुपये कोविड अनुदान मिळणार : दिलीप वळसे-पाटील

Abhijeet Shinde

चाकूचा धाक दाखवून एक तोळा सोन्याचा दागिना लंपास

Abhijeet Shinde
error: Content is protected !!