तरुण भारत

कोल्हापूर : महात्मा फुले जीवनदायी योजनेला मुदतवाढ

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या शक्यतेमुळे राज्य शासनाचा महत्वपूर्ण निर्णय

कोल्हापूर / कृष्णात पुरेकर

Advertisements

महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेला मुदतवाढ मिळणार आहे. कोरोनाच्या दुसऱया लाटेची शक्यता निर्माण झाल्याने राज्य सरकार हाय अलर्टवर आहे. कोरोनाच्या संकटात सर्वच आर्थिक थरातील रूग्णांना उपचार आणि गरज भासल्यास शस्त्रक्रियेचा लाभ मिळावा यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. जीवनदायी योजनेला मुदतवाढ देण्याच्या निर्णयापर्यंत राज्यशासन आले असून येत्या दोन तीन दिवसांत निर्णय जाहीर होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजना दारिद्रÎरेषेखालील रेशनकार्डधसारकांसाठी कायमस्वरूपी सुरू असते. मात्र कोरोनाच्या काळात या योजनेत केशरी आणि पांढऱया कार्डधारकांचा समावेश करण्यात आला होता. त्याला विस्तारित जीवनदायी योजना संबोधले गेले. मुदतवाढीत विस्तारित योजनेतील कार्डधारकांना मिळणार आहे.

गतवर्षी ऑक्टोबरमध्ये राज्य सरकारने महात्मा फुले जीवनदायी योजनेत सर्व रेशनकार्डधारक समाविष्ट केले आहेत. यापूर्वी याचा लाभ फक्त दारिद्रÎरेषेखालील कुटुंबांनाच मिळत होता. पण कोरोना साथीमुळे महाराष्ट्रातील सर्वच आर्थिक स्तरातील नागरिकांसाठी नव्याने विस्तारीत जीवनदायी आरोग्य योजना लागू केली. यामध्ये केशरी आणि पांढऱया रेशन कार्डधारकांनासुद्धा दीड लाखापर्यंतचे उपचार मोफत मिळणे शक्य झाले आहे. तसेच या योजनेद्वारे छोट्या-छोट्या आजारापासून ते मोठ्या आजारांपर्यंत सरकारी दवाखान्यांतून मिळणारे उपचारसुद्धा खासगी दवाखान्यांमधून मोफत मिळणार आहेत. युनायटेड इन्शुरन्स कंपनीच्या सहयोगातून पंधराशे कोटींची ही योजना राज्यात सुरु आहे. विस्तारीत जीवनदायी योजनेचा फायदा राज्यातील सर्वच नागरिकांना मोठÎा प्रमाणात झाला आहे.

जिह्यातील 45 दवाखाने जीवनदायी योजनेत समाविष्ट आहेत, काही मोठे दवाखाने योजनेत समाविष्ट होते. परंतु तपासणीत काही त्रुटी आढळल्यानंतर त्यांची सेवा बंद केली होती. पण कोरोना काळात पुन्हा अपवाद वगळता अन्य हॉस्पिटल्सना योजनेत समाविष्ट केले आहे. दरम्यान, कॅन्सर, मेंदू, मणका, किडनी, लिव्हरशी निगडीत व्याधीग्रस्तांना योजना अधिक फायदेशीर ठरली आहे. जिल्हÎात कोरोना काळात ऑक्टोबरपासून आजअखेर या योजनेचा सर्वाधिक लाभ पांढऱया, केशरी रेशनकार्डधारकांना झालेला आहे.

दोन तीन दिवसांत मुदतवाढीचा आदेश


राज्य शासनाने जीवनदायी योजनेला 31 मार्चपर्यत मुदतवाढ दिली होती. येत्या बुधवारी मुदत संपत आहे. पण सध्या राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता निर्माण झाल्याने योजनाला मुदतवाढ देण्यासंदर्भात गंभीरपणे विचार झाला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्य शासनाने मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला ओ. दोन तीन दिवसांत त्यावर शिक्कामोर्तब होणार असून अधिकृत घोषणाही केली जाणार आहे.

महात्मा फुले जीवनदायी योजनेची मुदत 31 मार्चला संपत आहे. मुदतवाढीसंदर्भात यापूर्वीच्या बैठकीत चर्चा झाली आहे. त्यामुळे दोन दिवसांत सरकारकडून मुदतवाढीचा आदेश निघण्याची शक्यता आहे. -डॉ. सुभाष नांगरे, जिल्हा समन्वयक जीवनदायी योजना

कोरोनाच्या संकटात सर्वाधिक लाभ

राज्यात गतवर्षी ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये कोरोनाचा कम्युनिटी स्प्रेड (सामुहिक संसर्ग) झाला होता. त्यावेळी राज्य शासनाने सर्वच रेशनकार्डधारकांना या योजनेत समाविष्ट केले होते. त्याचा सर्वाधिक लाभ जिल्हÎात कोरोना काळात पांढऱया, केशरी रेशन कार्डधारकांना झाला आहे.

Related Stories

शियेत आणखी तीन पॉझिटिव्ह : एकूण संख्या आठवर

Abhijeet Shinde

“आता कोर्टालाही महाराष्ट्रद्रोही म्हणणार का?” : अतुल भातखळकर

Abhijeet Shinde

करुळ घाटात संरक्षक कठडा ढासळला, घाट २६ जूलै पर्यंत बंद

Abhijeet Shinde

आजरा साखर कारखाना भाडेतत्त्वावर देण्याचा जिल्हा बँकेचा निर्णय

Abhijeet Shinde

महाराष्ट्रात 3,663 नवीन कोरोनाबाधित

Rohan_P

चांदोली, वारणा प्रकल्पग्रस्त आपल्या घरासमोर करणार आंदोलन

Abhijeet Shinde
error: Content is protected !!