तरुण भारत

मुलींच्या जन्मदरात चंदगड अव्वल, कागल पिछाडीवर

कृष्णात चौगले / कोल्हापूर

एखादा बेशिस्त, कामचुकार अधिकारी अथवा कर्मचाऱयास शिक्षा म्हणून त्याची चंदगडला बदली केली जाते. कोल्हापूर शहरापासून सुमारे दीडशे किलोमीटर अंतरावर असलेला हा तालुका म्हणजे कारागृह अथवा शिक्षा देण्याचे ठिकाण नव्हे, तर निसर्गसंपन्न असा एक दुर्गम तालुका आहे. त्यामुळेच शहराशी नाळ जोडलेल्यांना नोकरीसाठी हा तालुका गैरसोयीचा वाटतो. पण याच तालुक्यातील शून्य ते सहा वयोगटातील एक हजार मुलांमागे मुलींचे प्रमाण पाहता ते 1 हजार 21 इतके असून जिह्यातील इतर प्रगत तालुक्यांना लाजेने मान खाली घालायला लावणारे आहे. तर नेत्यांची ‘खाण’ असलेल्या कागलमध्ये सर्वात कमी म्हणजेज 881 इतके मुलींचे प्रमाण असून राधानगरी, पन्हाळा, करवीर, शिरोळ ते तालुकेही पिछाडीवर आहेत.

महिला-पुरुष जन्मदर कार्यक्रमांतर्गत केलेल्या सर्व्हेनुसार जानेवारी 2021 अखेर कोल्हापूर जिह्यामध्ये शून्य ते सहा वयोगटामध्ये एक हजार मुलांमागे 927 मुली असे प्रमाण आहे. जिह्यातील कागल, राधानगरी, पन्हाळा, करवीर, शिरोळ, भुदरगड या तालुक्यांमध्ये मुलांच्या तुलनेत मुलींचा जन्मदर कमी आहे. मागासलेला आणि दुर्गम म्हणून ओळखल्या जाणाऱया चंदगड तालुक्यामध्ये जिह्यात सर्वात जास्त 1021 इतके मुलींचे सरासरी प्रमाण असून जिह्यामध्ये प्रगतशील म्हणून ओळखल्या जाणाऱया कागल तालुक्यात सर्वात कमी 881 मुलींचे सरासरी प्रमाण आहे. आठ वर्षांपूर्वी दरहजार मुलांमागे मुलींचे प्रमाण सुमारे 150 ते 175 पर्यत कमी आढळल्याने शासनाने स्त्राrभ्रुणहत्या रोखण्याची मोहिम हाती घेतली. विविध स्तरावरून जनजागृती करण्यास सुरू केली. यावेळी पन्हाळा तालुक्यात मुलींचे सरासरी प्रमाण सर्वात कमी होते. आजही या तालुक्यात लेकींची संख्या लक्षणीय प्रमाणात वाढलेली नाही.

जिह्याच्या कानाकोपऱयात स्त्रीभ्रुणहत्येचे सत्र सुरुच

सर्वच क्षेत्रात महिलांची पुरुषांच्या बरोबरीने वाटचाल सुरु आहे. कुटुंबाचा कणा बनण्यातही त्या मागे राहिलेल्या नाहीत. तरीदेखील स्त्राrभ्रुण हत्यांच्या प्रकारामध्ये वाढच होत आहे. दिवसेदिवस मुलांच्या तुलनेत मुलींचे सरासरी प्रमाण घटत असल्यामुळे शासनाकडून गर्भलिंग निदान करणाऱयांसाठी कठोर कारवाईच्या तरतुदीसह ‘लेक वाचवा’ अभियान राबवले जात आहे. पण ‘वंशाला दिवा’ ही मूळ संकल्पना जशीच्या तशीच राहीला असून त्याला अधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाली. बेकायदेशीरपणे खरेदी केलेल्या पोर्टेबल सोनोग्राफी मशिनद्वारे निदान करून आजही गर्भातील कळी खुडण्याचे काम बिनदिक्कतपणे सुरु आहे. प्रशासकीय प्रातळीवरून अशा यंत्रणेचा शोध घेतला जात असला तरी त्यांना मोठय़ा मर्यादा आहेत. त्यामुळेच जिह्याच्या कानाकोपऱयात स्त्राrभ्रुणहत्येचे सत्र सुरुच आहे.

वर्षभरात मुलींच्या प्रमाणात घट
जानेवारी 2020 अखरेचे मुलींचे प्रमाण पाहता ते 1 हजार मुलांमागे 939 इतके होते. हेच प्रमाण जानेवारी 2021 मध्ये 927 झाले असून मुलींच्या प्रमाणात 12 अंकांनी घट झाली आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून मुलींचे प्रमाण वाढवण्यासाठी वर्षभरात महिलांचे प्रबोधन, लेक वाचवा अभियानांतर्गत निरनिराळ्या योजनांची माहिती देऊन मुला-मुलेंचा जन्मदर समसमान कसा राहिल यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

2011 च्या तुलनेत मुलींचे प्रमाण दिलासादायक
2011 मध्ये जिह्यात मुलींचे प्रमाण दरहजार मुलांमागे 902 इतके होते. सध्या ‘नŸशनल पŸढमिली हेल्थ’ सर्व्हेनुसार जिह्यातील मुलींचे प्रमाण 937 वर पोहोचले असून ते दिलासादायक झाले आहे. पूरपरिस्थिती आणि कोरोना महामारीमुळे जनजागृतीसह गर्भलिंगनिदानाच्या ठिकाणी धाडी टाकण्याच्या मूळ कार्यक्रमाकडे थोडे दुर्लक्ष झाले आहे. भविष्यात या परिस्थितीत सुधारणा झाल्यानंतर ‘लेक वाचवा’ची मोहिम गतीमान केली जाणार आहे.
डॉ. योगेश साळे, जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प. कोल्हापूर

शून्य ते सहा वयोगटातील मुला-मुलींचे तालुकानिहाय प्रमाण
तालुका दर एक हजार मुलांमागे मुलींचे प्रमाण
चंदगड 1021
हातकणंगले 956
आजरा 937
गडहिंग्लज 932
शाहूवाडी 931
गगनबावडा 923
भुदरगड 919
शिरोळ 919
करवीर 913
पन्हाळा 904
राधानगरी 902
कागल 881
एकूण (जिल्हा) 927

Advertisements

Related Stories

कोल्हापूर : कांतेचा आणखी दोन सराफांना तब्ब्ल ६४ लाखांचा गंडा

Abhijeet Shinde

कोल्हापूर : तारीख तीच.. वारही तोच… फक्त वर्ष बदलले !

Abhijeet Shinde

कोल्हापूर जिल्हय़ात आज कोरोनाचे 51 बळी, 1 हजार 494 नवे रुग्ण

Abhijeet Shinde

नरंदे परिसरात मुसळधार पाऊस; अनेक ठिकाणी झाडे पडली

Abhijeet Shinde

वैद्यकीयची प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया स्थगित करा

Abhijeet Shinde

कोल्हापूर : ‘बेटी बचाव बेटी पढ़ाओ’ उपक्रम घराघरात पोहचवा – मंत्री यड्रावकर

Abhijeet Shinde
error: Content is protected !!