तरुण भारत

ग्रामीणचे मीटर वितरण केंद्र 3 वर्षांपासून बंद

शहराच्या केंद्रावर पडतोय भार, हेस्कॉमच्या गलथान कारभाराचा नागरिकांना फटका

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

नवीन विद्युत मीटर उपलब्ध होण्यासाठी बेळगाव शहर व ग्रामीण अशी दोन वितरण केंद्रे उघडण्यात आली होती. परंतु काही कारणाने ग्रामीण भागासाठी असलेले केंद्र बंद झाले. याला 3 वर्षे उलटली तरी अद्यापही ते सुरू करण्यात आलेले नाही. यामुळे ग्रामीण भागातील मीटरचा भार शहर वितरण केंद्रावर पडू लागला आहे. हेस्कॉमच्या गलथान कारभाराचा फटका नागरिकांना बसू लागला आहे. त्यामुळे ग्रामीण भागासाठीचे मीटर वितरण केंद्र लवकर सुरू करण्याची मागणी होत आहे.

बेळगाव शहर व तालुक्मयाचा विस्तार वाढू लागला आहे. दररोज नवीन मीटर कनेक्शन घेणाऱयांच्या संख्येतही वाढ झाली आहे. परंतु सध्या रेल्वे स्टेशन येथील हेस्कॉम कार्यालयात असणाऱया मीटर वितरण केंद्रातून शहर व ग्रामीण भागासाठी मीटर उपलब्ध करून दिले जात आहेत. मागणीच्या प्रमाणात मीटरची उपलब्धता नसल्याने मागील अनेक महिने ग्राहकांना अडचणी येत आहेत. रांगा लावून मीटर घेऊन जाण्याची वेळ ग्राहकांवर येत आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांचे हेलपाटे

बेळगाव तालुक्मयाचा विस्तार मोठा आहे. परंतु नवीन मीटर घेताना नागरिकांना संबंधित विभागातील केंद्रामध्ये जाऊन कागदपत्रे द्यावी लागतात. तसेच मीटर मिळविण्यासाठी रेल्वे स्टेशन येथील कार्यालयात फेऱया माराव्या लागत आहेत. त्यामुळे यामध्ये हेस्कॉमने लक्ष घालून ही समस्या सोडविण्याची मागणी होत आहे. ग्रामीण भागातील बंद असलेले मीटर वितरण केंद्र सुरू करण्यासाठी बेळगाव इलेक्ट्रिक कॉंट्रक्टर असोसिएशनने पुढाकार घेतला होता. तशा आशयाचे पत्र हेस्कॉमच्या व्यवस्थापकीय संचालकांना पाठविले होते. परंतु अद्याप त्यावर हेस्कॉम प्रशासनाने कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे एकूणच हेस्कॉमच्या कारभाराबद्दल संताप व्यक्त होत आहे.

Related Stories

देवेगौडा-मोदी भेटीने जेडी(एस)-भाजप युतीची चर्चा सुरू

Abhijeet Shinde

इन्फोसिसचे २०० पेक्षा जास्त कर्मचारी अमेरिकेतून बंगळूरला परतले

Abhijeet Shinde

समर्थनगरमध्ये डेनेज वाहिन्या घालण्याची मागणी

Amit Kulkarni

वकिलांच्या गांधीगिरीमुळे मनपा अधिकारी झाले खजील

Omkar B

कार्तिकी एकादशीनिमित्त वडगाव विठ्ठल रुक्मिणी मंदिरात कार्यक्रम

Patil_p

वनखात्याचे बसवराज पाटील यांचा पर्यावरणप्रेमींकडून सत्कार

Omkar B
error: Content is protected !!