तरुण भारत

दिल्ली : सफदरजंग रुग्णालयातील आयसीयू वॉर्डला भीषण आग

  • 50 रुग्णांना केले दुसऱ्या वार्डमध्ये शिफ्ट 


ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 


दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयातील  आयसीयू वार्डला आज पहाटे 6.35 वाजता आग लागली असल्याची घटना घडली आहे. यामध्ये कोणतीही मानवी हानी झालेली नाही. आगीची माहिती मिळताच तात्काळ या वॉर्ड मधील 50 रुग्णांना दुसऱ्या वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आले आहे. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. 

Advertisements


मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी 6.35 वाजता रुग्णालयातील तळ मजल्यावरील आयसीयू वॉर्डला आग लागली. त्यानंतर लगेचच अग्निशमन दलाला याबाबत माहिती देण्यात आली. ही माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 9 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि तासाभरातच त्यांनी आग आटोक्यात आणली.


सद्य स्थितीत आग विझविण्यात आली असून सर्व जण सुरक्षित आहेत. मात्र, आयसीयूमधील सर्व मशिन्स आणि समान जळून खाक झाले आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. 

Related Stories

महाराष्ट्र : उद्यापासून सुरु होणार नाट्यगृह आणि सिनेमागृह!

Rohan_P

महाविकास आघाडी नेते आणि राज्यपालांची भेट ‘या’ कारणामुळे टळली

Abhijeet Shinde

कोरोना संकटात ‘या’ ऑस्ट्रेलियन खेळाडूकडून PM Care फंडला मदत!

Rohan_P

किरीट सोमय्यांचा पुन्हा कोल्हापूरला येण्याचा मुहूर्त ठरला

Abhijeet Shinde

दिल्लीत कोरोनाग्रस्तांची संख्या 1,34,403 वर

Rohan_P

पेट्रोल-डिझेलची दरवाढ थांबेना

Patil_p
error: Content is protected !!