तरुण भारत

”मी खोटं बोलत नाही कारण माझं नाव नरेंद्र मोदी नाही”

नवी दिल्ली / ऑनलाईन टीम

आसाममध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यासाठी अनुक्रमे १ एप्रिल आणि ६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी भाजप आणि काँग्रेस या दोन्ही प्रमुख पक्षांनी प्रचारासाठी कंबर कसली आहे. राहुल गांधी यांनी आज आसामच्या कामरूपमध्ये प्रचारसभा घेतली. या सभेत त्यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

यावेळी राहुल गांधी म्हणाले की, मी इथे तुमच्याशी खोटं बोलायला आलेलो नाही. कारण माझं नाव नरेंद्र मोदी नाही. आसामविषयी, शेतकऱ्यांविषयी किंवा इतर कोणत्याही गोष्टीविषयी तुम्हाला जर खोटं ऐकायचं असेल, तर तुम्ही टीव्ही सुरू करा आणि नरेंद्र मोदींचं तोंड बघा. ते २४ तास खोटं बोलतात. तसेच भाजप युवकांना मदत करण्याचा प्रयत्न करत नाही. उलट आसामवर आक्रमण करते. सीएए हा कायदा आसामवरचं आक्रमणच असल्याचे यावेळी राहुल गांधी म्हणाले.


हा फक्त एक कायदा नाही. हा तुमचा इतिहास, भाषा आणि बंधुत्वावर हल्ला आहे. त्यामुळेच आम्ही त्याला विरोध करत असल्याचे यावेळी राहुल गांधी म्हणाले.

Advertisements

Related Stories

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चिपळूण पूरग्रस्त भागाची करणार पाहणी

Abhijeet Shinde

दिल्लीत आयईडी स्फोट

Patil_p

इंधन भडका सुरुच; मुंबईत पेट्रोल शंभरीच्या उंबरठ्यावर!

Rohan_P

रॅपिड टेस्टिंग किटबाबत पूर्ण सहकार्य करू; चीनची भूमिका

prashant_c

महाराष्ट्रात आत्तापर्यंत 1 हजार 282 रुग्ण कोरोनामुक्त

prashant_c

स्वॅब तपासणीसाठी येणाऱयांचे आधार, ओटीपी क्रमांक घ्या

Patil_p
error: Content is protected !!