तरुण भारत

इलेक्ट्रिक वाहन निर्मितीत शाओमीची लवकरच एंट्री

शाओमी करणार गुंतवणूक- दिग्गज स्मार्टफोन कंपन्या वाहन निर्मितीकडे वळताहेत

नवी दिल्ली

Advertisements

चीनची दिग्गज स्मार्टफोन निर्मितीमधील कंपनी शाओमी कॉर्प आता वाहन क्षेत्रात पाय ठेवणार आहे. यासाठी येत्या काळात लवकरच नवीन योजना आखणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.

कंपनी नवीन स्मार्ट इलेक्ट्रिक वाहन निर्मिती व्यवसायात उतरणार असून शाओमी वाहन क्षेत्रासाठी वेगळी सब्सिडियरी (सहाय्यक कंपनी) बनविणार आहे. याकरीता जवळपास 11 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असल्याचा अंदाज आहे. तसेच येत्या 10 वर्षांच्या कालावधीत जवळपास 10 अब्ज डॉलरपेक्षा अधिकची रक्कम गुंतवण्याचे ध्येय कंपनीचे असल्याचे यावेळी स्पष्ट केले आहे.

चीनची दुसरी टेक कंपनी असलेल्या शाओमी कंपनीने चालू वर्षातील जानेवारीत चीनची दिग्गज कंपनी बायडू इंक यांनी इलेक्ट्रिक वाहन युनिट डेव्हलप करण्याची घोषणा केली होती. सदरच्या कंपनीच्या मदतीने आपला नवीन व्यवसाय करण्यावर भर देणार असल्याचे यावेळी शाओमीचे सीईओ ली जुन यांनी सांगितले आहे.

ऍपलही तयारीत अमेरिकन दिग्गज स्मार्टफोन निर्मितीमधील कंपनी ऍपलही इलेक्ट्रिक वाहने आणण्याची योजना आखत आहे. मीडिया अहवालानुसार इलेक्ट्रिक वाहनाच्या निर्मितीसाठी ऍपल काही अन्य ऑटोमोटिव्ह कंपन्यांसोबत चर्चा करत आहे.

Related Stories

स्पाइस जेटला 600 कोटींचा फटका

Patil_p

आर्थिक घोषणेमुळे बाजारात तेजीची उसळी

Patil_p

किरण मजुमदार शॉ यांना जागतिक उद्योजकाचा मान

Patil_p

एप्रिल-सप्टेंबरमध्ये डीमॅट खात्यांमध्ये दुप्पट वाढ

Omkar B

जागतिक टीव्ही बाजारात सॅमसंगचा दबदबा

Amit Kulkarni

बायोकॉन हिंदुजामध्ये वाटा घेणार

Omkar B
error: Content is protected !!