तरुण भारत

सिद्ध करण्यासारखे काहीच बाकी नाही!

कोलकाता नाईट रायडर्सचा अव्वल फिरकी गोलंदाज हरभजन सिंगचे प्रतिपादन

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

Advertisements

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील मुख्य प्रवाहातून यापूर्वीच बाहेर फेकला गेलेला अनुभवी फिरकीपटू हरभजन सिंग यंदाची आयपीएल स्पर्धा खेळणार आहे आणि याची कारणमीमांसा करताना तो म्हणतो, सिद्ध करण्यासाठी माझ्याकडे काहीच बाकी राहिलेले नाही आणि आता मी फक्त खेळाचा आनंद लुटण्यासाठीच खेळणार आहे.

भारतीय क्रिकेट इतिहासातील महान फिरकी गोलंदाजांपैकी एक असणारा हरभजनन मागील हंगामात सहभागी झाला नव्हता. संयुक्त अरब अमिरातीत मागील हंगामात झालेल्या आयपीएल स्पर्धेत हरभजन चेन्नई सुपरकिंग्स संघात समाविष्ट होता. मात्र, त्याने यासाठी अमिरातीला जाणे टाळले होते. त्यानंतर यंदाच्या मोसमासाठी त्याला केकेआर संघाने करारबद्ध केले आहे.

‘भाई ये क्यू खेल रहा है’, असे मला आजही विचारले जाते. पण, याचे माझ्याकडे एकच उत्तर आहे, ‘अरे भाई ये उनकी सोच है, मेरी नही. मेरी सोच ये है की मै अभी खेल सकता हू, तो मै खेलूंगा’, अशा शब्दात हरभजन सिंगने आपल्या आयपीएल सहभागाचे यावेळी समर्थन केले.

‘सिद्ध करण्यासाठी माझ्याकडे काहीच बाकी नाही. त्यामुळे, माझ्यावर कोणत्याही जबाबदारीचे ओझे नाही. मी माझ्या नैसर्गिक खेळावर भर देईन. क्रिकेट खेळत राहणे आताही मला समाधान देते आणि पूर्ण तंदुरुस्त असताना मी खेळत राहीन’, असे या अनुभवी फिरकीपटूने येथे नमूद केले.

हरभजनच्या खात्यावर 700 पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय बळी असून त्याच्यासाठी हा 23 वा व्यावसायिक हंगाम आहे. त्याने 1998 मध्ये कसोटी पदार्पण केले होते.

‘मी आता 20 वर्षांचा राहिलेलो नाही, ही वस्तुस्थिती आहे. पण, आता 40 व्या वर्षी देखील तंदुरुस्तीवर माझा भर आहे आणि या स्तरावर यश खेचून आणण्याची क्षमता माझ्यात आहे. अपेक्षा व जबाबदारी तर असणारच. त्याला खरे उतरण्याचा माझा पुरेपूर प्रयत्न असेल’, असे आयपीएलमध्ये 150 बळी मिळवणाऱया या अनुभवी गोलंदाजाने येथे सांगितले.

यंदा कोलकाता नाईट रायडर्सची फिरकी गोलंदाजी धुरा मुख्यत्वेकरुन हरभजन सिंगवरच अवलंबून असणार आहे. या संघात कुलदीप यादवचा समावेश आहे. मात्र, सध्या कुलदीप अतिशय खराब फॉर्ममध्ये आहे तर वरुण चक्रवर्ती तंदुरुस्तीच्या समस्यांनी त्रस्त आहे.

मागील वर्षी का खेळला नाही?

संयुक्त अरब अमिरातीत संपन्न झालेल्या मागील आयपीएल हंगामात का खेळला नाही, याचाही खुलासा हरभजनने येथे केला. ‘मागील आयपीएल स्पर्धा आयोजित केली गेली, त्यावेळी कोव्हिड-19 चा भारतात उद्रेक सुरु होता. मला माझ्या कुटुंबियांची काळजी होती आणि भारतात परतल्यानंतर प्रचंड बंधनांचे क्वारन्टाईन होणे क्रमप्राप्त होते. पण, यंदा ही स्पर्धा भारतातच होते आहे आणि व्हॅक्सिन्सही आले आहेत. माझी पत्नी गीता हिने मला, तू आयपीएल खेळायला हवे, असे सांगितले’, याचा त्याने उल्लेख केला.

Related Stories

ऑकलंड टेनिस स्पर्धेत सेरेना विजेती

Patil_p

होबार्ट हरिकेन्सची विजयी सलामी

Patil_p

जोकोविच, केनिन-मुगुरुझा अंतिम फेरीत

Patil_p

बार्टी-अँड्रेस्क्यू यांच्यात अंतिम लढत

Patil_p

किंग्स इलेव्हन पंजाब संघ पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत

tarunbharat

2020 आयपीएलचे वेळापत्रक

Patil_p
error: Content is protected !!