तरुण भारत

बेळगाव डायबेटीज सेंटरची यशस्वी वाटचाल

23 व्या वर्षात पदार्पण :  संचालिका डॉ. नीता देशपांडे यांच्याकडून मधुमेहासंदर्भात विनामूल्य आरोग्य शिबिरे

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

मधुमेह ही वैद्यकीय उपचारपद्धतीची स्वतंत्र अशी शाखा आहे. आणि त्यासाठी मधुमेह तज्ञांची आवश्यकता आहे असे मानले जात नव्हते. त्या काळात म्हणजेच 31 मार्च 1999 मध्ये बेळगाव डायबेटीज सेंटरची स्थापना झाली. बेळगाव शहर आणि परिसरात मधुमेही रुग्ण दिवसेंदिवस वाढत होते. त्या तुलनेत मधुमेह तज्ञांची म्हणजेच डॉक्टरांची संख्या कमी होती. मधुमेह हा असा आजार आहे. ज्याचा स्वीकार करताना रुग्णांना त्रास होतो. त्यामुळे रुग्णांवर उपचार करणे, त्याचबरोबर त्यांचे कौंन्सिलिंग (समुपदेशन) करणे आवश्यक असते. याच हेतूने डॉ. नीता देशपांडे यांनी 31 मार्च 1999 मध्ये बेळगाव डायबेटीज सेंटरची स्थापना केली. आज हे सेंटर यशस्वीरित्या 22 वर्षे पूर्ण करून 23 व्या वर्षात पदार्पण करत आहे.

दीर्घकाळाचा मधुमेह हा डायबेटिक न्युरोपॅथी (मधुमेहाचा पायांवर होणारा दुष्परिणाम) सारख्या समस्या निर्माण करू शकतो. दुर्लक्ष झाल्यास गँगरीन किंवा पाय कापावा लागण्याची वेळ येवू शकते. हे लक्षात घेऊन 2002 मध्ये वर्ल्ड डायबेटीस फौंडेशनने कर्नाटकात 10 ‘डायबेटिक फूट केअर सेंटर्स’ प्रायोजित केले. त्यापैकी बेळगाव डायबेटीस सेंटर हे एक आहे. येथे पावलांची आणि पायांची काळजी घेण्याबाबत सातत्यांने मार्गदर्शन केले जाते. व दरवषी पायाशी संबंधीत सर्व तपासण्या केल्या जातात.

सेंटरच्या संचालिका डॉ. नीता देशपांडे या मधुमेह तज्ञ तसेच अभ्यासक आणि संशोधक आहेत. मधुमेहा संदर्भात सतत त्या विनामूल्य आरोग्य शिबिरे घेतात. त्याचवेळी भारतामध्ये अलिकडे झपाटय़ाने स्थूलत्व (ओबेसीटी) समस्या वाढत आहे. हे लक्षात घेऊन 2004 मध्ये त्यांनी स्वतंत्र स्थूलत्व नियंत्रण केंद्र स्थापन केले. येथे तज्ञांद्वारे वजन नियंत्रणाबाबत उपचार केले जातात.

मधुमेही गर्भवतींचा उपचार पूर्णतः वेगळा असतो. याठिकाणी बाळ सुखरुपपणे जन्माला यावे व मातेच्या मधुमेहाचा बाळावर परिणाम होऊ नये याची काळजी घेतली जाते. याठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘रिसर्च सेंटर’-2006 मध्ये स्थापन झाले. आजवर याठिकाणी 75 हून अधिक मधुमेह, स्थूलत्व व हृदयरोग या विषयांवर अभ्यास झाला आहे.

लहान मुलांचा मधुमेह हा विशिष्ट पद्धतीने हाताळावा लागतो. त्यांचे वय लक्षात घेता त्यांची समजूत काढणे, मनोबल वाढविणे आवश्यक असते. त्याचवेळी पालक व शाळेतील शिक्षक यांचे समुपदेशनही करावे लागते. यासाठी 2014 मध्ये ‘चिल्ड्रन्स डायबेटिक सेंटर’ची स्थापना झाली. तसेच सामाजिक बांधिलकी म्हणून 2014 मध्ये डॉ. के. एच. बेळगावकर फौंडेशनची स्थापना झाली. या फौंडेशनतर्फे दरवषी इन्शुलीन, ग्लुकोमिटर, इन्शुलीन पम्स मधुमेही मुलांना दिले जातात. त्यांच्यासाठी शिबिरे घेतली जातात.

अत्यंत काळजीपूर्वक उपचार

बेळगाव डायबेटीज सेंटरमध्ये मधुमेही नागरिक, मधुमेही बालके यांच्यावर अत्यंत काळजीपूर्वक उपचार केले जातात. याशिवाय पायांची काळजी, स्थूलत्व नियंत्रण, रिव्हर्सल डायबेटीज अशा सर्व विकारांवर उपचार केले जातात. नामवंत आहारतज्ञ डॉ. नितीन पाटणकर व शिल्पा जोशी या सदर केंद्राशी सलग्न आहेत. मधुमेही रुग्णांनी आपली ग्लुकोज पातळी नियंत्रणात ठेवावी असाच सेंटरचा आग्रह आहे. यापुढे मधुमेह स्थूलत्व, हृदयविकार असे आजार होऊ नयेत यासाठी जीवनशैलीमध्ये कसा बदल करता येईल, याबाबत विविध उपक्रम राबविले जाणार आहेत.

Related Stories

कलाश्री बंब लकी ड्रॉ सोडतचे नारायण मुचंडीकर दुचाकी विजेते

Amit Kulkarni

शहरात भटक्मया कुत्र्यांचा उपद्रव

Patil_p

समाजसेवेचा वसा निवृत्तीनंतरही कायम ठेवा

Amit Kulkarni

बेळगाव विभागाचा बारावीचा निकाल 59.7 टक्के

Rohan_P

प्रशासनातर्फे श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी

Amit Kulkarni

विहिंप-बजरंग दलतर्फे दोन रुग्णवाहिका जनसेवेत रुजू

Amit Kulkarni
error: Content is protected !!