तरुण भारत

विद्यार्थ्यांसाठी धान्य वाटप योजना सुरूच ठेवा

पालक, विद्यार्थीवर्गांतून मागणी ; मध्यान्ह आहारला नापसंती

वार्ताहर / उचगाव

Advertisements

बेळगाव तालुक्मयामध्ये गेल्या एक वर्षापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना तयार आहाराऐवजी धान्यांचे वाटप करण्यात येत आहे. ही योजना अशीच पुढे चालू ठेवावी, धान्यांचे वाटप विद्यार्थ्यांना करावे, तयार मध्यान्ह आहार नको, अशी मागणी बेळगाव तालुक्मयातील पालक, विद्यार्थी वर्गांतून करण्यात येत आहे.

कोरोनामुळे शाळा बंद असल्या तरी शिक्षण खात्याने जूनपासून विद्यार्थ्यांना मध्यान्ह आहार देण्याचा निर्णय घेतला होता. तसेच सुरुवातीला पहिली ते पाचवी व सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना तांदूळ, डाळ याचे वितरण करण्यात आले. ऑक्टोबरपासून विद्यार्थ्यांना तांदूळ, डाळींसोबत तेल, मीठ व गहू असे धान्यांचे वितरण सुरू केले. मात्र शाळा सुरू होण्यास विलंब झाला. यंदा एप्रिल व मे महिन्यात ही शाळा सुरू राहणार असल्याने विद्यार्थ्यांना मध्यान्ह आहार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु 11 एप्रिलनंतर धान्य वाटप बंद करून जेवण देण्याचे विचाराधिन आहे. तयार आहार वितरित करण्याची योजना शासनाकडे मागितली आहे. परंतु या सूचनेला बेळगाव तालुक्मयातून पालक-विद्यार्थी वर्गांतून विरोध होण्याची शक्मयता अधिक आहे. कारण विद्यार्थ्यांना तयार जेवण नको आहे. सध्या जे धान्य पुरवठा केला जातो. ही पद्धत कायम चालू ठेवावी, अशी मागणी तालुक्मयातून होत आहे.

तयार आहाराला नापसंती

तयार जेवण खाण्यासाठी अनेक विद्यार्थी नाखूष असताना दिसतात. मध्यान्ह आहार योजनेमध्ये अनेक विद्यार्थी हे जेवण खाऊ शकत नाहीत. मात्र धान्यांचे वितरण केल्यानंतर सदर धान्य प्रत्येक विद्यार्थ्यांच्या घरी गेल्याने त्याचा योग्य तो उपयोग घरी कुटुंबामध्ये केला जातो. यासाठी शासनाने ही योजना विद्यार्थ्यांना धान्य वाटप अशीच कायम ठेवावी, अशी मागणी बेळगाव तालुक्मयातील जनतेतून करण्यात येत आहे.

काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा संसर्ग कमी कमी होताना दिसत होता. परंतु पुन्हा एकदा राज्यात कोरोनाने डोके वर काढल्याने विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी शिक्षण खाते प्रयत्नशील आहे. त्यामुळे तयार आहार देण्याऐवजी धान्यांचे वितरण करावे, अशी मागणी करण्यात येत आहे. कर्नाटक शासनाने ही योजना कार्यान्वित करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

जि. पं. बैठकीत मुद्दा मांडू : सरस्वती पाटील (जि. पं. सदस्या)

शासनाने तयार जेवणाऐवजी धान्यांचे वितरण गेल्या एक वर्षापासून सुरू आहे. तीच पद्धत कायम ठेवावी, या धान्यांचा उपयोग चांगल्याप्रकारे ग्रामीण भागातील प्रत्येक घरातील विद्यार्थ्यांना होताना दिसतो आहे. सदर बाब जिल्हा पंचायत बैठकीमध्ये मी मांडणार असल्याची माहिती जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना दिली.

अन्नाची नासाडी मोठय़ा प्रमाणात : मथुरा तेरसे (ता. पं. सदस्या)

विद्यार्थी तयार जेवण मनापासून खात नाहीत. अनेक शाळांमधून एनजीओमार्फत देण्यात आलेले जेवण विद्यार्थी मनापासून खात नसल्याने शिल्लक राहिल्याचे अनेक शाळेतून दिसून येत होते. शिवाय सदर अन्नाची नासधूस केल्याचेही दिसून येते. यासाठी शासनाने विद्यार्थ्यांना धान्यांचे वाटप करावे, ही योजना अशीच पुढे चालू ठेवावी, यासाठी ता. पं. बैठकीमध्ये हा विषय मी मांडू, असे ‘तरुण भारत’शी बोलताना तालुका पंचायत सदस्या मथुरा तेरसे यांनी सांगितले.

Related Stories

आता राज्यात 24-7 प्राथमिक आरोग्य केंद्रे

Patil_p

बुडाच्या बैठकीकडे शहरवासियांचे लक्ष

Amit Kulkarni

पश्चिम भागात रोप लागवडीस प्रारंभ

Patil_p

साहित्य हा मानवी जीवनाचा सर्जनशील अविष्कार

Patil_p

बाळेकुंद्री खुर्द पाटील गल्लीत पावसाचे पाणी रस्त्यावरच साचून

Amit Kulkarni

मराठा, आरोही, एसजी, डीबी विजयी

Amit Kulkarni
error: Content is protected !!