तरुण भारत

हॉटेल वरील निर्बंध शिथिल करा

शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना दिले निवेदन

प्रतिनिधी/सांगली

सांगली व मिरज शहरातील हॉटेल व्यावसायिकांना जमावबंदीच्या काही निर्बंधामुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे. हॉटेल व्यावसायिकांना येत असलेल्या अडचणी व लोकांना होत असलेल्या असुविधे बदल शहर जिल्हा कॉंग्रेस चे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांची भेट घेऊन पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली.

या चर्चेनंतर पृथ्वीराज पाटील यांनी मुंबई येथे राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची भेट घेत त्यांना सर्व हॉटेल व्यावसायिक व खाद्य विक्रेते यांच्या प्रश्नांचे निवेदन दिले. तर, सांगली मिरजेतील हॉटेल व्यावसायिकांना निर्बंध लावताना शिथिलता द्यावी अशी मागणी केली. याबाबत मंत्री वडेट्टीवार यांनी मार्ग काढण्याचे आश्वासन दिले.

Related Stories

तिहेरी खूनप्रकरणी मृत्युदंडाची मागणी

Abhijeet Shinde

सांगली महापालिकेला सेवाकर थकबाकीतून मोठा दिलासा

Abhijeet Shinde

रोजगार हमी व ग्रंथालय समितीवर आ. विक्रमसिंह सावंत यांची निवड

Abhijeet Shinde

सांगली : मिरज पूर्व भागातील महिलांचा पंतप्रधान मोदींशी संवाद

Abhijeet Shinde

मिरज-कोल्हापूर रेल्वे वाहतूक पुन्हा बंद

Abhijeet Shinde

सांगली जिल्ह्यात 335 जण कोरोनामुक्त तर 231 नवे रूग्ण

Abhijeet Shinde
error: Content is protected !!