तरुण भारत

उत्तराखंड : 4 जणांचा मृत्यू; 293 नवीन कोरोना रुग्ण

  • 1800 पेक्षा अधिक रुग्णांवर उपचार सुरु 


ऑनलाईन टीम / देहरादून : 


उत्तराखंडात पुन्हा एकदा कोरोना बाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. मागील 24 तासात 293 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले. तर 4 रुग्णांचा मृत्यू झाला. प्रदेशात ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या 1800 पेक्षा अधिक आहे. त्यामुळे प्रदेशात एकूण रुग्णांची संख्या 1 लाख 00 हजार 411 इतकी झाली आहे. 

Advertisements

दरम्यान, रुग्ण वाढीच्या मानाने रुग्ण कमी होण्याचे प्रमाण कमी आहे. कालच्या दिवसात केवळ 118 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. बुधवारी 11,061 नमुने निगेटिव्ह आले आहेत. काल देहरादून जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजेच 171 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर हरिद्वारमध्ये 70, नैनिताल 21, उधमसिंह नगर 16, टिहरी, चमोली आणि पिथोरागडमध्येे प्रत्येकी दोन, पौडीमध्ये 7, बागेश्वर आणि उत्तरकाशीमध्ये प्रत्येकी एक – एक रुग्ण तर अल्मोडा, रुद्रप्रयाग आणि चंपावतमध्ये एकही रुग्ण आढळून आलेला नाही. 


सद्य स्थितीत 1863 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर एकूण 95,330 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले. दरम्यान, प्रदेशात आतापर्यंत 1717 (1.71 %) रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. सद्य स्थितीत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.94 % इतके आहे. 

Related Stories

तेलंगणा : भूमिगत हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर स्टेशनमध्ये भीषण आग

datta jadhav

यशवंत सिन्हा यांचा ‘तृणमूल’मध्ये प्रवेश

Patil_p

कोरोनावर प्रभावी ‘कॉकटेल ड्रग’चा दिल्लीत वापर

datta jadhav

देशात 18,177 नवे बाधित, 217 मृत्यू

datta jadhav

येथे घरांना मिळते मुलींचे नाव

Patil_p

पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार; दोघांचा मृत्यू

Patil_p
error: Content is protected !!