तरुण भारत

पुणे : महापौर मुरलीधर मोहोळ यांनी घेतली कोरोनाची पहिली लस

ऑनलाईन टीम / पुणे : 


देशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात मोठ्या प्रमाणात लसीकरण सुरू आहे.लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला आजपासून सुरूवात झाली. केंद्र सरकारने तिसऱ्या टप्प्यात 45 वर्षांपुढील सर्वांसाठी लसीकरण खुले केले आहे. दरम्यान, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी देखील आज लसीकरण केंद्रावर जाऊन लसीकरणाचा पहिला डोस टोचून घेतला. 

Advertisements


मिळालेला माहितीनुसार, महापौर मुरलीधर मोहोळ यांनी कोथरुड येथील महापालिकेच्या सुतार दवाखाना येथे पहिली लस घेतली.

यावेळी महापौर मोहोळ म्हणाले की, पुणे शहरात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. असे असले तरी ही साथ आटोक्यात आणण्याच्या दृष्टीने आपण विविध उपाययोजना केल्या. वर्षभरात नागरिक लस केव्हा येणार या प्रतिक्षेत होते. अखेर आपल्या सर्वांना लस उपलब्ध झाली असून, नागरिक लस घेत आहे. मात्र नागरिकांमध्ये अनेक गैरसमज पाहण्यास मिळत आहे. नागरिकांनी न घाबरता लस घ्यावी. ही लस पूर्णपणे सुरक्षित आहे, असे आवाहनही महापौरांनी यावेळी केले आहे.


पुढे ते म्हणाले, सद्य स्थितीत शहरात 114 केंद्रांवर लसीकरण सुरू असून, दररोज साधारण 15 हजार नागरिकांना लस दिली जात आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात तीन लाख 60 हजार नागरिकांना लस देण्यात आली आहे. तर 45 वर्षांपुढील साधारण 15 लाख लोकसंख्या आहे. त्यामुळे या सर्वांना लस दिली जाणार आहे. शहरातील प्रत्येक नागरिकाला लस मिळण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार आहे. 


दरम्यान, शहरातील वाढती रुग्ण संख्या लक्षात घेत नागरिकांनी स्वतः ची काळजी घ्यावी, तसेच सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहनही त्यांनी पुणेकरांना केले आहे.  

Related Stories

गँगस्टर अरुण गवळीच्या मुलीचे अभिनेता अक्षय वाघमारे सोबत उद्या होणार लग्न

Abhijeet Shinde

मोस्ट वाँटेड गँगस्टर काला जेठडी दिल्ली स्पेशल सेलच्या जाळ्यात

Abhijeet Shinde

मराठा आरक्षण रद्द : पुण्यात मराठा कार्यकर्त्यांचे आंदोलन 

Rohan_P

जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या हस्ते ई-फेरफार सातबाऱ्याचे वाटप

Rohan_P

आंबिल ओढ्यातील कारवाई दुर्दैवी, नितीन राऊत पुणे महापौरांवर कडाडले

Rohan_P

राज ठाकरेंच्या नावे खंडणी मागणारी टोळी गजाआड

Abhijeet Shinde
error: Content is protected !!