तरुण भारत

कोरोनाचा उद्रेक : पाकिस्तानमध्ये रुग्णांनी भरली रुग्णालये; परिस्थिती गंभीर

  • मागील 24 तासात 4,974 नवीन कोरोना रुग्ण 


ऑनलाईन टीम / इस्लामाबाद : 


पाकिस्तानमध्ये दिवसेंदिवस कोरोनाची स्थिती गंभीर होत चालली असून रुग्ण संसर्ग देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रुग्णालयांची क्षमता अपुरी पडू लागली आहे. मीडियाकडून गुरुवारी मिळालेल्या माहितीनुसार, मागील 24 तासात 4,974 नव्या रुग्णांची नोंद झाली तर 98 जणांनी आपला जीव गमावला आहे. 

Advertisements


20 जून 2020 नंतरची ही सर्वात मोठी रुग्ण संख्या आहे. 20 जूनला एका दिवसात 5,948 रुग्ण आढळून आले होते. राष्ट्रीय आरोग्य सेवा मंत्रालयाने सांगितले की, आतापर्यंत देशात कोविड 19 चे 6 लाख 72 हजार 931 रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील 14,530 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 6 लाख 5 हजार 274 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. 


दरम्यान, सध्या पाकिस्तानमध्ये कोरोना रुग्णांची संख्या एवढी वाढली आहे की तेथील रुग्णालयांची क्षमता अपुरी पडत आहे. विशेष म्हणजे पीआयएमएस देशातील तृतीयक चिकित्सा सेवा रुग्णालय आहे जेथे देशभरातील रुग्ण अत्यावस्थ स्थितीत आणले जातात तेथे देखील बेड शिल्लक नसल्याने रुग्णांना दुसरीकडे न्यावे लागत आहे. 

अशीच परिस्थिती इस्लामाबाद मधील पॉलिक्लिनिकमध्ये आहे. येथे एकही व्हेंटिलेटर उपलब्ध नाही आहे. येथे विविध विभागात दररोज 7 हजार रुग्ण येतात. त्यामुळे येथील परिस्थिती चिंताजनक बनली असून नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. 

Related Stories

मेक्सिकोत मेट्रो ट्रेनसह पूल कोसळला; 15 ठार

datta jadhav

फ्रान्समध्ये कोरोना रुग्णसंख्या 25 लाखांच्या उंबरठ्यावर

datta jadhav

तालिबानच्या समर्थनार्थ पाककडून पंजशीरवर बॉम्बहल्ला

datta jadhav

उत्तर कोरियाकडून हायपरसोनिक क्षेपणास्त्राचे परीक्षण

Patil_p

नेपाळचे माजी पंतप्रधान भट्टराई 7 दिवसांच्या भारत दौऱयावर

Patil_p

अमेरिकेत पुढील महिन्यात लसीकरण मोहिमेला सुरुवात

datta jadhav
error: Content is protected !!