तरुण भारत

जगप्रसिद्ध फोर्ब्सच्या यादीत ऍड. युवराज नरवणकर

देशातील प्रभावशाली 50 वकिलांत कोल्हापूरच्या सुपुत्राचा समावेश

प्रतिनिधी / कोल्हापूर

Advertisements

जगप्रसिद्ध फोर्ब्स मासिकाने भारतातील सर्वोत्तम आणि प्रभावशाली पन्नास वकिलांची यादी जाहीर केली आहे. या यादीत कोल्हापूरचे सुपुत्र असणारे आणि सध्या उच्च व सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टीस करणारे ऍड. युवराज नरवणकर यांचा समावेश केला आहे. दरवर्षी उद्योग क्षेत्रातील नामांकने फोर्ब्सतर्फे जाहीर केली जातात. यावर्षी पहिल्यांदाच कायदा क्षेत्राचा समावेश या नामांकनंमध्ये करण्यात आला आहे. नवी दिल्लीत ही यादी प्रसिद्ध करण्यात आली.

न्यायालयातील अनुभव, विविध क्षेत्रातील काम आणि इतर अनेक आव्हानात्मक निकष फोर्ब्सच्या नामांकनंसाठी वापरले जातात. यावर्षीच्या नावांची निवड करणाऱया ज्युरी पॅनेलमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधिश मदन लोकूर, न्यायमूर्ती ए. के. सिक्री, सह-सॉलिसिटर जनरल, सर्वोच्च न्यायालयातील सिद्धार्थ लुथ्रा यांच्यासह इतर अनेक वरिष्ठ अधिवक्ता आणि चार नॅशनल लॉ स्कूलचे कुलगुरू यांचा समावेश होता. बुधवारी रात्री नवी दिल्ली येथे वर्च्युअल स्वरूपात झालेल्या कार्यक्रमांमध्ये या नावांची घोषणा करण्यात आली.

लवकरच या कार्यक्रमाचे प्रक्षेपण दूरचित्रवाणीवर देखील होणार आहे. ऍड. युवराज नरवणकर सध्या मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय येथे कार्यरत असून अनेक महत्त्वाच्या खटल्यांमध्ये आणि याचिकांमध्ये त्यांचा महत्वपूर्ण सहभाग राहिला आहे. नुकतीच केंद्र सरकारच्या नाणेनिधीचे प्रमुख कायदेशीर सल्लागार म्हणून त्यांची नियुक्ती झाली आहे. कोल्हापूरच्या टोल विरोधी आंदोलनात कृती समितीच्या वतीने ऍड. नरवणकर यांनी उच्च न्यायालयात बाजू मांडली होती.

Related Stories

टोप येथे शॉर्टसर्किटने तीन एकरातील ऊस जळाला

Abhijeet Shinde

एफएटीएफ : पाकची धडपड

Patil_p

हिमाचल प्रदेश : माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण

Rohan_P

जम्मू-काश्मीर : शोपियानमधील मिनी सचिवालयावर दहशतवादी हल्ला

Rohan_P

UGC चे निर्देश : 1 ऑक्टोबरपासून सुरु होणार नियमित सत्र

Rohan_P

सनी लियोनीला उच्च न्यायालयाचा दिलासा

Patil_p
error: Content is protected !!