तरुण भारत

रोहित म्हणाला, वणक्कम चेन्नई!

चेन्नई : आयपीएल स्पर्धेतील विद्यमान विजेत्या मुंबई इंडियन्सचे संघसहकारी गुरुवारी यंदाच्या आयपीएल मोसमासाठी चेन्नई शहरात दाखल झाले. हॉटेलमध्ये क्वारन्टाईन होत असताना मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने एक व्हीडिओ करत त्यात वणक्कम चेन्नई, मुंबई इंडियन्स इंगे वंदितो (हॅलो चेन्नई, मुंबई इंडियन्स येथे दाखल झाली आहे), असा संदेश दिला. यंदाच्या आयपीएल मोसमात मुंबई इंडियन्स व आरसीबी यांच्यात दि. 9 एप्रिल रोजी सलामीची लढत रंगणार आहे.

कोव्हिड-19 च्या प्रतिकूल परिस्थितीमुळे यंदा आयपीएलचे सामने 6 ठिकाणी होणार असून स्पर्धेत सहभागी सर्व संघ तटस्थ ठिकाणी आपले सामने खेळणार आहेत. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर प्ले-ऑफचे सामने होतील. शिवाय, यंदाची फायनल देखील जागतिक स्तरावरील या सर्वात मोठय़ा स्टेडियमवरच खेळवली जाणार आहे.

Advertisements

Related Stories

क्रोएशियाच्या ऑलिंपिक चॅम्पियन्सचा सराव सुरू

Patil_p

टी-20 विश्वचषकात रबाडा चौथा हॅट्ट्रिकवीर

Patil_p

रोममध्ये जोकोव्हिचचे पाचवे विजेतेपद

Patil_p

सनरायजर्स हैदराबादचा एकतर्फी विजय

Patil_p

भारतीय महिला संघाची विजयी सुरुवात

Patil_p

सलामी लढतीत ऑस्ट्रेलिया-द. आफ्रिका आमनेसामने

Patil_p
error: Content is protected !!