तरुण भारत

महिला विश्वचषकासाठी 9 शहरे निश्चित

ऑकलंडमध्ये पहिला, सिडनीमध्ये अंतिम सामना होणार

वृत्तसंस्था / झ्युरिच

Advertisements

2023 मध्ये होणाऱया महिलांच्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचा सलामीचा सामना ऑकलंडमधील ईडन पार्कवर तर अंतिम सामना सिडनीतील स्टेडियम ऑस्ट्रेलिया येथे खेळविला जाणार असल्याचे फिफाने जाहीर केले. या स्पर्धेतील सामन्यांची 9 ठिकाणे त्यांनी निश्चित केली आहेत.

ऍडलेड, ब्रिस्बेन, डय़ुनेडिन, हॅमिल्टन, मेलबर्न, पर्थ व वेलिंग्टन या ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडमधील अन्य सात केंद्रांवर या स्पर्धेतील सामने होणार आहेत. ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडमध्ये प्रत्येकी एक उपांत्य सामना आयोजित केला जाणार असून या स्पर्धेचे पूर्ण वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येणार असल्याचेही फिफाने सांगितले. ‘ही नऊ शहरे महिला विश्वचषकासाठी तसेच ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड व जगभरातील खेळाडू व चाहत्यांसाठी माईलस्टोन ठरणार आहेत,’ असे फिफा अध्यक्ष जियानी इन्फन्टिनो यांनी म्हटले आहे. ‘2023 मधील महिलांची विश्वचषक स्पर्धा ही ऑस्ट्रेलियात होणारी 2000 सिडनी ऑलिम्पिकनंतरची सर्वात मोठी स्पर्धा असेल. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडमधील लाखो चाहते या स्पर्धेचा आनंद लुटणार आहेत,’ असे न्यूझीलंड फुटबॉलच्या अध्यक्षा जोहाना वूड यांनी सांगितले. यजमान असल्याने न्यूझीलंड व ऑस्ट्रेलियाचे संघ या स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. महिलांच्या विश्वचषक स्पर्धेत प्रथमच 32 संघ सहभागी होणार आहेत.

Related Stories

माजी क्रिकेट गुणलेखक दिनार गुप्ते कालवश

Amit Kulkarni

बर्म्युडा ठरला सुवर्ण जिंकणारा सर्वात छोटा देश!

Patil_p

बीसीसीआयच्या हंगामी सीईओपदी हेमांग अमीन

Patil_p

भारतीय टीमचा प्रशिक्षक व्हायचे आहे : शोएब अख्तर

Rohan_P

न्यूझीलंडचा बांगलादेशला ‘व्हॉईटवॉश’

Patil_p

महिला, पुरुष क्रिकेट संघ इंग्लंडला एकत्र प्रयाण करणार

Patil_p
error: Content is protected !!