तरुण भारत

कोरोना फैलाव वाढताच

एकाच दिवसात 265 बाधित, एकाचा मृत्यू,: रुग्णसंख्येत मडगावने पणजीला टाकले मागे

प्रतिनिधी / पणजी

Advertisements

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाटय़ाने वाढत असून बुधवारवर गुरवार बराच भारी पडला आहे. बुधवारी 200 बाधीत सापडले होते, गुरुवारी त्यात आणखी 265 ची भर पडली. त्याचबरोबर गेल्या कित्येक दिवसांपासून पणजी केंद्रात कायम सर्वाधिक रुग्ण होते. त्याला काल मडगाव केंद्राने मागे टाकले. पणजीत आता 176 तर मडगावात 185 रुग्ण आहेत. कांदोळी, पर्वरी, वास्को व फोंडा या केंद्रातील रुग्णसंख्या 110 ते 150 दरम्यान पोहोचली आहे. आतापर्यंत हवाई, रेल व रस्तामार्गे आलेल्या बाधित प्रवाशांची संख्याही एक किंवा दोन अशी अल्पच असायची, काल त्यातही वाढ होत तब्बल 10 बाधित सापडले आहेत.

गुरुवारी 24 तासात 265 रुग्ण सापडले आहेत. त्याद्वारे सक्रीय रुग्णसंख्या 1716वर पोहोचली आहे. गुरुवारी 104 जण बरे झाले आहेत. त्याचबरोबर 24 तासात एकाचा मृत्यू झाल्याने आतापर्यंतच्या एकूण मृतांची संख्या 831 झाली आहे. आतापर्यंत एकूण 58304 जणांना कोरोनाची बाधा झाली. त्यातील 55757 जण बरे झाले. संशयित रुग्ण म्हणून 24 जणांना गोमेकॉत भरती करण्यात आले तर 58 जणांना होम आयसोलेशन देण्यात आले आहे.

सध्या विविध आरोग्य केंद्रात उपचार घेणाऱया रुग्णात सर्वाधिक 185 रुग्ण मडगाव केंद्रात आहेत. त्याखालोखाल पणजी केंद्रात 176 रुग्ण आहेत. पर्वरीत 157, फोंडय़ात 137, कांदोळीत 125, वास्कोत 112, म्हापसात 75, कुठ्ठाळीत व कासावलीत प्रत्येकी 71, शिवोलीत 60, चिंबल 56, चिंचिणी 46 व हळदोणेत 43 रुग्ण आहेत. अन्य सर्वत्र 40 पेक्षा कमी रुग्ण आहेत.

सक्रीय रुग्णांची केंद्रवार संख्या पुढीलप्रमाणे आहेः डिचोली 31, सांखळी 41, पेडणे 26, वाळपई 02, म्हापसा 75, पणजी 176, हळदोणा 43, बेतकी 21, कांदोळी 125, कासारवर्णे 09, कोलवाळ 22, खोर्ली 37, चिंबल 56, शिवोली 60, पर्वरी 157, मये 04, कुडचडे 24, काणकोण 11, मडगाव 185, वास्को 112, बाळ्ळी 15, कासावली 71, चिंचिणी 46, कुठ्ठाळी 71, कुडतरी 18, लोटली 36, मडकई 11, केपे 16, सांगे 08, शिरोडा 10, धारबांदोडा 21, फोंडा 137 व नावेलीत 29 रुग्ण आहेत. त्याशिवाय हवाईमार्गे आलेले 10 प्रवाशी बाधित सापडले आहेत.

  • 01 एप्रिलपर्यंतचे एकूण रुग्ण                    58304
  • 01 एप्रिलपर्यंतचे बरे झालेले रुग्ण 55757
  • 01 एप्रिलपर्यंतचे सक्रिय रुग्ण                   1716
  • 01 एप्रिल रोजीचे नवे रुग्ण                      265
  • 01 एप्रिल रोजी बरे झालेले रुग्ण               104
  • 01 एप्रिल रोजीचे बळी               01
  • आतापर्यंतचे एकूण बळी              831

Related Stories

तिस्क पीडीए मार्केटमधील व्यापाऱयांच्या डोक्यावर टांगता धोका

Amit Kulkarni

मनपाकडून मार्केटमधील अतिक्रमणांवर कारवाई

Amit Kulkarni

लुईझिन फालेरो राज्यसभेवर जाण्याची शक्यता

Amit Kulkarni

भाजन, नाटय़कला टिकवण्यात पं. वामनराव पिळगावकर यांचे मोठे योगदान

Patil_p

केपे, तिळामळ, जांबावली परिसरात निर्जंतुकीकरण मोहीम

Omkar B

माझ्यासाठी जग हे एक कॉरिडोअरसारखे

Amit Kulkarni
error: Content is protected !!