तरुण भारत

जितेंद्र आव्हाडांकडून रक्तदान करण्याचे आवाहन

मुंबई / ऑनलाईन टीम

राज्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा स्थितीत राज्यात राज्यात सात ते आठ दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा शिल्लक राहिला आहे. या पार्श्वभूमीवर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी तरुण-तरुणींना रक्तदान करण्याचे आवाहन सोशल मीडियाच्या माध्यमातून केले आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत म्हटले आहे की, राज्यात केवळ सात-आठ दिवस पुरेल इतका रक्तसाठा उरला आहे. आज कोरोनाला न घाबरता, सोशल डिस्टसिंग पाळून खासकरुन तरुण-तरुणींनी बाहेर पडून रक्तदान करावे. कुणाचे तरी प्राण वाचविण्यासाठी आपलं रक्त उपयुक्त ठरेल, ही भावना मनात ठेवून रक्तदान करा.

यासोबतच कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत राज्याच्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात येणार आहे.

Advertisements

Related Stories

महाराष्ट्रात कोरोनाचा विस्फोट; 30,535 नवे रुग्ण; 99 मृत्यू

Rohan_P

महाराष्ट्रातील कोरोना : मागील 24 तासात 8,010 नवे रुग्ण; 170 मृत्यू

Rohan_P

रत्नागिरी: लांजात कंटेनरला अपघात; हायवेवर 5 तास वाहतूक ठप्प

Abhijeet Shinde

हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर कोरोना पॉझिटिव्ह

Rohan_P

दिल्लीत CRPF च्या आणखी 12 जवानांना कोरोनाची बाधा

datta jadhav

तौक्ते चक्रीवादळग्रस्तांना चक्रीवादळग्रस्तांप्रमाणे नुकसानभरपाई देणार – मुख्यमंत्री

Abhijeet Shinde
error: Content is protected !!