तरुण भारत

जम्मू काश्मीरमध्ये दिवसभरात 517 नवे कोरोना रुग्ण

  • सद्य स्थितीत 3,215 रुग्णांवर उपचार सुरू 


ऑनलाईन टीम / जम्मू : 


जम्मू काश्मीरमध्ये दिवसभरात 517 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 5 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 1 लाख 31 हजार 938 वर पोहोचली आहे.  

Advertisements

मिळालेल्या माहितीनुसार, मिळालेल्या नव्या रुग्णांमध्ये जम्मूतील 96 आणि काश्मीर मधील 421 जणांचा समावेश आहे. सद्य स्थितीत 3,215 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.


त्यातच दिलासादायक बाब म्हणजे काल दिवसभरात 171 रुग्णांना डिस्चार्ज दिला. तर आतापर्यंत 1,26,720 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये 51,634 रुग्ण जम्मूतील तर 75,086 जण काश्मीरमधील आहेत.  

  • मृतांचा आकडा 2 हजार पार 


तर आतापर्यंत 2003 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये जम्मूतील 738 जण तर काश्मीरमधील 1265 जणांनी आपला जीव गमावला आहे. 

Related Stories

कोरोना : जम्मू काश्मीरमध्ये 133 नवे रुग्ण; 419 जणांना डिस्चार्ज

Rohan_P

3727 बांगलादेशींची 3 वर्षांमध्ये हकालपट्टी

Patil_p

आसाममध्ये 1616 उग्रवाद्यांचे आत्मसमर्पण

Patil_p

आसाम : संशयित अतिरेक्यांनी 7 ट्रक पेटवले, 5 चालकांचा होरपळून मृत्यू

Rohan_P

केंद्रातून भाजपला हटवेपर्यंत ‘खेला होबे’

Patil_p

लॉक डाऊन कुठे कठोर आणि कुठे शिथिल करायचे हे राज्यांनी ठरवा, मोदींची मुख्यमंत्र्यांना सूचना

prashant_c
error: Content is protected !!