तरुण भारत

विद्यागमसह नववीपर्यंतचे वर्ग बंद

कोरोना संसर्गवाढीच्या पार्श्वभूमीवर कठोर मार्गसूची : जीम, क्लब, स्विमिंग पूल बंद : राज्य सरकारचे मुख्य सचिव पी. रवीकुमार यांचा आदेश

प्रतिनिधी / बेंगळूर

Advertisements

कोरोना संसर्गवाढीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कठोर नियम असणारी मार्गसूची जारी केली असून विद्यागमसह सहावी ते नववीपर्यंतचे वर्ग बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तर दहावी ते बारावीपर्यंतचे वर्ग नियमितपणे सुरू ठेवण्यात येत आहेत. राज्यातील जीम, स्विमिंग पूल पूर्णपणे बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. तर बसमध्ये नियोजित आसन क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांना प्रवेश न देण्याची सूचना करण्यात आली आहे. मागील आठवडय़ात जारी केलेल्या आदेशाप्रमाणे कोणत्याही प्रकारचे आंदोलन, संप, रॅली काढता येणार नाही. यात्रा, उत्सवांवरील निर्बंधही पुढील आदेशापर्यंत जैसे थेच राहणार आहेत.

शेजारील महाराष्ट्र, केरळमध्ये कोरोना रुग्णवाढीमुळे राज्य सरकारने खबरदारी घेत शुक्रवारी दुपारी राज्य सरकारचे मुख्य सचिव पी. रविकुमार यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ अधिकाऱयांची बैठक घेऊन राज्यात कठोर नियम जारी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, राज्यात लॉकडाऊन, सेमी लॉकडाऊन, नाईट कर्फ्यु जारी न करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

नवी कोविड मार्गसूची…

@ विद्यागमसह 6 वी ते 9 वी पर्यंतचे वर्ग स्थगित. दहावी, अकरावी आणि बारावीचे वर्ग मात्र नियमित सुरू राहणार. पण हजेरीची सक्ती नाही

@ उच्च शिक्षण महाविद्यालये आणि व्यावसायिक कोर्स प्रशिक्षण मंडळ/ विद्यापीठांच्या परीक्षा देणारे आणि वैद्यकीय शिक्षणाचे वर्ग वगळता इतर सर्व वर्ग स्थगित.

@ वसती शाळा आणि बोर्डिंग असणाऱया शाळांमधील दहावी ते बारावी बोर्डाची परीक्षा देणारे विद्यार्थी, उच्च शिक्षण आणि व्यावसायिक शिक्षण कोर्स, वैद्यकीय वर्ग वगळता सर्व वर्ग स्थगित.

@ धार्मिक स्थळांमध्ये वैयक्तिक प्रार्थनेला मुभा. पण, सामूहिकपणे सर्व प्रकारच्या धार्मिक कार्यक्रमांवर निर्बंध

@ अपार्टमेंट, कॉम्प्लेक्समधील किंवा सामूहिक निवासस्थानांमधील तसेच सर्व जीम, पार्टी हॉल, क्लब हाऊस, स्विमिंग पूल बंद.

@ कोणत्याही प्रकारच्या रॅली, आंदोलने, संपावर निर्बंध

@ सार्वजनिक परिवहन व्यवस्थेत नियोजित आसन क्षमतेपक्षा अधिक प्रवाशांना प्रवेश नाही

@शॉपिंग मॉल, बंदीस्त मार्केट आणि डिपार्टमेंटल स्टोअर्समध्ये मास्क, शारीरिक अंतर, हॅन्ड सॅनिटायझर, हॅन्ड वॉशचा वापर सक्तीचा. नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई.

@ सार्वजनिक ठिकाणी धार्मिक आचरण आणि यात्रा महोत्सव, मेळा, एकत्र येण्यावर निर्बंध.

@ विविध सभा/समारंभामध्ये प्रवेश देण्याबाबत 12 मार्च रोजी दिलेल्या आदेशानुसार मर्यादित प्रवेश.

@ कार्यालये व इतर कामांच्या ठिकाणी शक्यतो घरातूनच काम करण्याची (वर्क फ्रॉम होम) व्यवस्था करण्यास प्राधान्य द्यावे.

@ बेंगळूर शहर, बेंगळूर ग्रामीण, म्हैसूर, गुलबर्गा, मंगळूर, उडुपी, बिदर आणि धारवाड जिल्हय़ांमध्ये चित्रपटगृहांमध्ये 50 टक्क्यांपर्यंत प्रेक्षकांना प्रवेश. एक आसन सोडून एक आसनावर बैठक व्यवस्था करणे.

@ बेंगळूर शहर, बेंगळूर ग्रामीण, म्हैसूर, गुलबर्गा, मंगळूर, उडुपी, बिदर आणि धारवाड जिल्हय़ांमध्ये पब, बार, क्लब, रेस्टॉरंटमध्ये कमाल ग्राहक क्षमतेच्या 50 टक्के ग्राहकांनाच प्रवेश.

@ कोविड मार्गसूचीचे उल्लंघन करणारे पब, बार, क्लब, रेस्टॉरंट कोविड संसर्ग संपुष्टात येईपर्यंत बंद करणार.

Related Stories

क्मयूआर कोड स्कॅन उपक्रमाचे गोगटे महाविद्यालयात उद्घाटन

Amit Kulkarni

विनाअनुदानित प्राध्यापक-शिक्षकांना वाली कोण?

Patil_p

निपाणीत उरुसाची सांगता

Patil_p

जमखंडीत परिवहन कर्मचाऱयांना लसीकरण

Patil_p

केएलईमध्ये हृदयरोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया

Amit Kulkarni

हुबळी-धारवाड बायपासवर ‘ओव्हरटेक’ वर उपाययोजना

tarunbharat
error: Content is protected !!