तरुण भारत

नितीश राणाला संघासमवेत सरावाची संमती

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

कोलकाता नाईट रायडर्सचा फलंदाज नितीश राणाला गुरुवारी कोव्हिड-19 चा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर संघसहकाऱयांसमवेत सराव करण्याची संमती मिळाली. नितीश राणाला दि. 21 मार्च रोजी मुंबईत दाखल झाल्यानंतर कोरोनाचा संसर्ग झाला होता आणि त्यानंतर त्याला संघाच्या हॉटेलमध्ये आयसोलेट केले गेले होते. आता त्याचा निगेटिव्ह अहवाल आला असल्याने त्याला संघसहकाऱयांसमवेत सरावाची परवानगी मिळाली आहे.

Advertisements

नितीशने दि. 19 मार्च रोजी कोरोना चाचणी केली आणि त्यावेळी निगेटिव्ह अहवाल आल्यानंतर दि. 21 रोजी तो मुंबईत दाखल झाला. दि. 22 रोजी त्याची नव्याने चाचणी घेतली गेली आणि तो पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. नितीश राणाने 2020 मध्ये युएईत संपन्न झालेल्या मागील आयपीएल स्पर्धेत 14 सामन्यात 352 धावा फटकावल्या होत्या.

केकेआरची सलामी लढत दि. 11 एप्रिल रोजी सनरायजर्स हैदराबादविरुद्ध होत असून यासाठी तो तंदुरुस्त असणार का, हे पहावे लागेल. अलीकडेच संपन्न झालेल्या विजय हजारे चषक स्पर्धेत राणाने दिल्लीतर्फे सर्वाधिक 398 धावा फटकावल्या होत्या. त्या स्पर्धेत त्याची 7 सामन्यातील सरासरी 66.33 इतकी राहिली आहे.

Related Stories

अँडी मरेचा पराभव

Patil_p

ऑनलाईन नेशन्स कप बुद्धिबळ स्पर्धेत भारताला पाचवे स्थान

Patil_p

माजी रणजी क्रिकेटपटू ध्रुव केळवकर यांचे निधन

Abhijeet Shinde

कोरोनामुळे युरोपियन पात्र फेरीच्या तीन क्रिकेट स्पर्धा रद्द

Patil_p

सुमित मलिक बंदीविरोधात दाद मागणार

Patil_p

एटीपी मानांकनात फेडरर टॉप-10 मधून बाहेर

Patil_p
error: Content is protected !!