तरुण भारत

रोनाल्डोच्या आर्मबँडची 75000 डॉलर्सला विक्री

वृत्तसंस्था/ बेलग्रेड, सर्बिया

गेल्या आठवडय़ात येथे झालेल्या विश्वचषक पात्रता फेरीतील फुटबॉल सामन्यात पोर्तुगालचा कर्णधार क्रिस्टियानो रोनाल्डोने हातावरील आर्मबँड रागाने फेकून दिले होते. त्या आर्मबँडचा चॅरिटीसाठी लिलाव करण्यात आला असून बोली लावणाऱया एका अज्ञाताला ते 64,000 युरोजला (75,000 डॉलर्स) विकले गेले आहे, असे सर्बियाच्या स्थानिक टीव्हीने शुक्रवारी वृत्त दिले आहे.

Advertisements

सर्बियातील एका मानवातावादी ग्रुपने रोनाल्डोचे निळय़ा रंगाचे कॅप्टन्स आर्मबँड ऑनलाईनवर लिलावासाठी ठेवले होते. एका सहा महिन्याच्या बालकाच्या पाठीच्या कण्यात दोष निर्माण झाल्याने त्याच्यावरील उपचारासाठी लिलावात जमा झालेली रक्कम देण्यात येणार आहे. तीन दिवस चाललेल्या या लिलावावेळी काही वादग्रस्त प्रसंगही उद्भवले. लिलावात भाग घेतलेल्या काही जणांनी प्रचंड रकमेची बोली लावून लिलाव प्रक्रिया उधळून लावण्याचा प्रयत्न केला होता. या नकली बोली लावणाऱयांमुळे सार्वजनिकांनी त्यावर तीव्र प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केल्यानंतर त्यांचा शोध घेऊन दोषींवर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन आयोजकांनी दिले.

गेल्या शनिवारी सर्बिया व पोर्तुगाल यांच्यातील सामना 2-2 असा बरोबरीत राहिला होता. या सामन्यातील इंज्युरी टाईममध्ये रोनाल्डोने गोल नोंदवला होता. पण तो रेफरीनी फेटाळून लावल्यानंतर त्याने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. रोनाल्डोने गोलरक्षकावरून मारलेला चेंडू टप्पा पडल्यानंतर गोललाईन पार करून गेलाय असे दिसत होते. पण त्याचवेळी सर्बियाच्या खेळाडूने तो क्लीयर केल्याने रेफरीनी तो गोल झाला नसल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे ड्रेसिंगरूममकडे जाताना रोनाल्डोने रागाने आपले आर्मबँड टचलाईनजवळ फेकून दिले. तेथे डय़ुटीवर असलेल्या एका फायरफायटरने ते लगेच ताब्यात घेतले आणि चॅरिटी ग्रुपच्या हवाली केले. रोनाल्डोच्या कृतीवर मात्र अनेकांनी टीका केली आणि त्याच्या संतप्त प्रतिक्रियेमुळे फिफा त्याच्यावर कारवाई करण्याची शक्यता असल्याचे मानले जात आहे.

Related Stories

रामकुमार विजयी, गुणेश्वरन पराभूत

Patil_p

द. आफ्रिकेविरुद्ध पाकिस्तान 200 धावांची आघाडीवर

Patil_p

खुन्नस देण्यावरून युवकाचा खून

Patil_p

अल्फा रोमिओला गिव्होनेझीचा निरोप

Patil_p

विराटने विश्रांतीची मागणी केलेली नाही

Patil_p

भारताच्या ज्योती सुरेखा व्हेनामला सुवर्ण

Amit Kulkarni
error: Content is protected !!