तरुण भारत

कोव्हिड व्हॅक्सिन पासपोर्ट-काळाची गरज ठरेल

कोरोना महामारीस रोखण्यासाठी संशोधकांनी अहोरात्र मेहनत घेऊन लस तयार केली. आता कोव्हिड लसीकरण मोठय़ा प्रमाणात सुरू झाले आहे. याचा परिणाम म्हणून पुढील काही महिन्यानी कोरोना संसर्गाची परिस्थिती तसेच जनजीवन सर्वसामान्य होईल असे वाटत आहे. लसीकरणामुळे सध्या जगभर एक नवीन गोष्ट चर्चेत येऊ लागली आहे, ती म्हणजे ‘कोव्हिड पासपोर्ट’ किंवा ‘व्हॅक्सिन पासपोर्ट’. काही देशात याला ‘ईम्युनिटी पासपोर्ट’ सुद्धा म्हणतात. यापुढे कोणत्याही देशात आपण प्रवास करणार असाल तर आपणास असा पासपोर्ट किंवा डिजिटल डॉक्मयुमेंट्स लागण्याची शक्मयता नाकारता येत नाही. देशांतर्गत अथवा आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी व टुरिझम सेक्टरला मजबुती देण्यासाठी असे पासपोर्ट सर्वच देश देण्यास सुरू करतील. नुकतेच स्वीडन, डेन्मार्क, चीन, इटली, इत्यादी अनेक देशांनी अशा प्रकारचे डिजिटल युनिव्हर्सल डॉक्मयुमेंट (पासपोर्ट) आपल्या नागरिकांना देण्यासाठी तयारी सुरू केली आहे. जागतिक पातळीवर सर्वत्र चालणारा                                                                                                                                       ‘व्हॅक्सिन पासपोर्ट’ तयार करण्यासाठी आंतरराष्ट्रीय टुरिझम, जागतिक आरोग्य संघटना व इस्रायल, युकेसारखे देश मिळून यासाठी नियोजन सुरू केले आहे. ही डिजिटल डॉक्मयुमेंट तयार करताना यामध्ये त्या देशातील नागरिकाचे नाव, वय, पत्ता, देश, त्याचा वैद्यकीय इतिहास, त्याने कोणत्या कंपनीची कोव्हिड लस घेतली आहे, कधी व किती डोस घेतले आहेत याची नोंद असेल. त्यासोबतच त्यांना कोव्हिड होऊन गेला आहे का, त्यानंतर त्याने कोव्हिड लस घेतली का, सध्या ती व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आहे किंवा नाही याची नोंद तसेच त्याच्या शरीरात किती कोरोना अँटीबॉडीज आहेत हेही असेल. अशी आरोग्यविषयक प्रत्येकाची सर्व माहिती देणारा हा ‘डिजिटल कोव्हिड पासपोर्ट’ असेल. हा पासपोर्ट जागतिक पातळीवर अपलोड झालेला असेल. त्यामुळे कोणत्याही देशात त्याचा वापर होऊ शकेल. ज्या नागरिकाकडे हा दस्तावेज आहे त्यांना क्मयूआर कोड दिला जाईल व त्यास जगभर मान्यता असेल. याचे स्वरूप डिजिटल सर्टिफिकेट, फोनअप अथवा छोटय़ा कार्डप्रमाणे असू शकते.

कोरोना महामारीमुळे सध्या सर्वत्र बंधने घातली जात आहेत. लाखो लोकांचे पर्यटन दौरे रद्द झाले आहेत. त्यापुढे भविष्यात देशांतर्गत अथवा आंतरराष्ट्रीय प्रवास करताना व्हॅक्सिन पासपोर्ट अत्यावश्यक ठरण्याची शक्मयता आहे. हा लसीकरणाची माहिती देणारा पासपोर्ट असल्याने प्रवास, देवालये, जिम, हॉटेल, मॉल, थिएटर, ऑफिस कामकाज, समारंभ इत्यादी गोष्टींसाठीसुद्धा हा दस्तावेज दरवाजे उघडणारा ठरेल. सध्या भारतात अनेक राज्यांनी ‘कोव्हिड टेस्ट निगेटिव्ह’ रिपोर्ट असल्याशिवाय राज्यात येण्यास प्रवेश बंदी केली आहे. ज्या नागरिकांनी कोरोना लसीचे दोन डोस पूर्ण केले आहेत किंवा ज्यांना कोरोना होऊन गेला आहे व त्यांनी लस घेतली आहे, अशांना असे ‘व्हॅक्सिन पासपोर्ट’ दिले तर त्यांना वारंवार कोव्हिड टेस्ट करण्याची वेळ येणार नाही. लसीकरण पूर्ण झालेले नागरिक स्वतः कोरोना होण्यापासून बचाव करतात व इतरांना संसर्ग देण्याचीही शक्मयता अत्यल्प असते. या कारणास्तव त्यांना मुक्त पर्यटन व प्रवास करण्याची मुभा असेल तसेच या दस्तावेजामुळे क्मवारंटीन नियमातून सूट मिळू शकेल. भारतातील नागरिकांना अशा प्रकारचे ‘डिजिटल डॉक्मयुमेंट्स’चे वाटप केले तर याचे महत्त्व जाणून  लसीकरणासाठी लोक मोठय़ा संख्येने पुढे येतील. यापूर्वीही ‘यलो फिवर’ प्रतिबंधक लसीकर झालेल्यांसाठी ‘यलो कार्ड’ हा मुख्य पुरावा ग्राह्य मानला जातो. अनेक देशांमध्ये प्रवेश करताना तो सादर करणे अत्यावश्यक असते. असाच  डिजिटल ‘कोव्हिड व्हॅक्सिन पासपोर्ट’ जगभर प्रवास करण्यासाठी उपयुक्त दस्तावेज ठरेल. अशाप्रकारचा दस्तावेज बनवण्यासाठी अनेक देशातील कॉट्रस् नेटवर्क, आयबीएमसारख्या कंपन्यांनी यावर काम सुरू केले आहे. कोव्हिड आजार पूर्णतः नवीन असल्याने त्यावर अजूनही संशोधन सुरू आहे, लस घेऊनही सौम्य कोरोना होत आहे, वेगवेगळय़ा प्रकारच्या लसीमुळे अँटीबॉडीज तयार होण्याचे प्रमाणही कमी-जास्त आहे. व्हायरस सतत म्युटेशन होत आहे. व्यक्तीची प्रायव्हसी, डाटा एन्ट्री या सर्वांचा परिणाम हा दस्तावेज बनवताना होऊ शकतो. कोव्हिडसंबंधी सर्व  वैद्यकीय नोंदी असलेला ‘व्हॅक्सिन पासपोर्ट’ हा दस्तावेज भारत सरकारने सर्व नागरिकांना उपलब्ध करून देणे ही काळाची गरज ठरणार हे नक्की. यापुढे लग्नाच्या अथवा इतर कार्यक्रमांच्या निमंत्रण पत्रिकेवर ’कृपया ज्यांच्याकडे व्हॅक्सिन पासपोर्ट आहे त्यांनी कार्यास अगत्य येण्याचे करावे’. अथवा ज्यांच्याकडे असा पासपोर्ट आहे अशा नागरिकांनी आमच्या देशात प्रवेश करावा अन्यथा नाही अशा प्रकारचे संदेश यापुढे पहावयास मिळाले तर आश्चर्य वाटू नये.

Advertisements

डॉ. संजय पंतबाळेकुंद्री

Related Stories

विश्वकर्मा जयंती हा कामगार दिन असावा

Patil_p

दूध उत्पादकाची परवड

Patil_p

पडिलें मौन वैखरिये

Patil_p

सहज उपलब्ध ‘विनामूल्य’-तेच सर्वाधिक ‘अमूल्य’

Patil_p

ना घर का ना घाट का

Patil_p

मंडला कला काय आहे आणि त्याचे महत्त्व काय?

Patil_p
error: Content is protected !!