तरुण भारत

आपली प्रकृती स्थिर रवी नाईक यांचे स्पष्टीकरण

प्रतिनिधी / फोंडा

फोंडय़ाचे आमदार तथा माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांना मेंदूचा सौम्य झटका आल्याच्या वृत्तामुळे गुरुवारी सर्वत्र खळबळ माजली. नेमकी 1 एप्रिल म्हणजे एप्रिल फुलच्या दिवशीच ही बातमी पसरल्याने त्यासंबंधी संभ्रम निर्माण झाला. खुद्द रवी नाईक यांनीच नंतर या वृत्ताबद्दल खुलासा करताना काही राजकीय लोकांनी ही अफवा पसरविल्याचे सांगून त्यांना ‘देव बरे करु’ अशी प्रतिक्रियाही व्यक्त केली. आपण रुटीन तपासणीसाठी मणिपाल इस्पितळात दाखल झालो असून आपल्याला ब्रेन स्ट्रोक किंवा चक्करही आलेली नाही. आपल्याला मानेचा त्रास असल्याने दर दोन वर्षांनी आपण बंगळूर येथील इस्पितळात जाऊन तपासणी करतो. गेल्या वर्षभरात कोरोनामुळे बंगळूरला जाता आले नाही, त्यामुळे दोनापावल येथील मणिपाल इस्पितळात तपासणीसाठी दाखल झालो आहे. आपली प्रकृती स्थित आहे. आपल्याला ब्रेन स्ट्रोक आल्याची निव्वळ अफवा असल्याचे रवी नाईक यांचे म्हणणे आहे. या खळबळजनक वृत्तामुळे नेमके कुणी कुणाला एप्रिल फुल केलेले आहे, हे मात्र समजू शकलेले नाही.

Advertisements

Related Stories

जुन्या भाजप कार्यकर्त्यांचे कोरगावात शक्तिप्रदर्शन

Amit Kulkarni

साळगाव भाजप मंडळातर्फे गिरी येथील वृद्धाश्रमाला भेट

Amit Kulkarni

मुख्यमंत्र्यांचा काणकोणातील ‘स्वयंपूर्ण मित्रां’शी संवाद

Patil_p

सोमवारी भारत बंदचे आयोजन

Amit Kulkarni

शेळ मेळावलीप्रकरणी मंत्री गोविंद गावडे यांनी भूमिका स्पष्ट करावी

Patil_p

दाबोळी विमानतळावर 50 लाखांचे सोने जप्त

Omkar B
error: Content is protected !!