तरुण भारत

खासबाग येथे चेंबर ठरतोय धोकादायक

प्रतिनिधी / बेळगाव

संभाजी रोड, खासबाग येथे ड्रेनेज चेंबर खराब झाला असून तो धोकादायक स्थितीत आहे. मुख्य रस्त्यामध्येच चेंबर खराब झाल्याने अपघातांना कारणीभूत ठरत आहे. स्थानिक अपघात होऊ नये, यासाठी चेंबरच्या सभोवती दगड लावून ठेवले आहेत. परंतु रात्रीच्यावेळी सुसाट येणाऱया वाहनचालकांना हा चेंबर दृष्टीस पडत नसल्याने अपघात होत आहेत. त्यामुळे चेंबरची त्वरित दुरूस्ती करावी, अशी मागणी खासबागच्या रहिवाशांकडून केली जात आहे.

Advertisements

डेनेज वाहिनीसाठी ठेवण्यात आलेला चेंबर खराब होऊन त्या ठिकाणी खड्डा पडला आहे. अपघात होऊ नये, यासाठी नागरिकांनी त्यामध्ये दगड व माती भरली आहे. परंतु हा चेंबर अपघातांना आमंत्रण ठरत आहे. मुख्य रस्त्यावरच चेंबर खराब असल्याने वाहनचालकांना बाजूने वाहने वळवावी लागत आहेत. रात्रीच्यावेळी तर अनेक अपघातही होत आहेत. परंतु याकडे महानगरपालिकेने पूर्णपणे दुर्लक्ष केल्यामुळे याचा फटका स्थानिकांना बसू लागला आहे.

सप्टेंबरमध्ये मनपाला निवेदन

येथील रहिवासी आनंदगौडा पाटील यांनी सप्टेंबर महिना महानगरपालिका आयुक्तांना या संदर्भात निवेदन दिले होते. निकृष्ट दर्जाचे रस्त्याचे काम तसेच पाणी गळतीबाबत त्यांनी मनपा आयुक्तांना माहिती दिली होती. अनेक दिवसांपासून या चेंबरची स्थिती जैसे थेच आहे. महानगरपालिकेला निवेदन देवून सहा महिने उलटले तरी अद्याप त्यावर कोणतीच कार्यवाही केलेली नाही. एखाद्या निरपराध्याचा बळी गेल्यानंतरच मनपाला जाग येणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Related Stories

अलायन्स एअरची पुणे विमानसेवा तात्पुरती बंद

Amit Kulkarni

माजी पंतप्रधान वाजपेयींची जयंती साजरी

Patil_p

बसुर्ते नवग्रह ब्रह्मलिंग मंदिर उद्घाटन समारंभाला प्रारंभ

Patil_p

मंगळवारी जिल्हय़ात कोरोनाचे 36 रुग्ण

Amit Kulkarni

राज्यात 161 नवे रुग्ण : 164 जणांना डिस्चार्ज

Patil_p

सिल्क इंडिया प्रदर्शनाचे उद्घाटन

Amit Kulkarni
error: Content is protected !!