तरुण भारत

सांगली जिल्ह्यात पहिल्याच दिवशी १६ हजार जणांना लस

223 उपकेंद्रावर केले नियोजन ः महिन्यात पाच लाख लोकांना देणार लस

प्रतिनिधी / सांगली

Advertisements

जिल्ह्यात 45 वर्षापेक्षा अधिक वय असणाऱ्या 15 हजार 957 जणांना कोव्हिशिल्ड ही कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे. संपूर्ण महिन्यात पाच लाख लोकांना लस देण्यात येणार आहे. जिल्ह्यात 227 उपकेंद्रावर ही लस देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे यांनी दिली.

शासनाने 45 पेक्षा अधिक वय असणाऱ्या सर्वांना कोरोनाची कोव्हिशिल्ड ही कोरोना प्रतिबंधक लस देण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात 227 उपकेंद्रावर लस देण्याची सोय करण्यात आली आहे. शुक्रवारी गुडफ्रायडेची सुट्टी असताना ही मोठयाप्रमाणात लसीकरण करण्यात आले आहे. पहिल्याच दिवशी जवळपास 16 हजार लोकांनी लस घेतली आहे. त्यामुळे येत्या महिन्याभरात पाच लाख लोकांना लस देण्याचे उद्दिष्ट सहज पूर्ण होऊ शकते असेही त्यांनी सांगितले. ही लस घेण्यासाठी फक्त आधार कार्ड घेऊन येण्यास सांगितले आहे. तसेच ही लस संपूर्णपणे मोफत आहे. जिल्ह्यात जुने 111 आणि नवीन 116 अशा 227 उपकेंद्रावर ही लस देण्याची सोय केली आहे. ही लस सुट्टीच्याही दिवशी देण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी ही लस लवकरात लवकर घ्यावी असे आवाहन डॉ. पोरे यांनी केले आहे.

जिल्ह्यात 45 वर्षावरील सहा लाख 30 हजार नागरिक आहेत. त्यातील जवळपास दीड लाख लोकांना लसीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे उर्वरित पाच लाख लोकांना या एप्रिल महिन्यामध्ये लस देण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे. या लसीचे दोन डोस असून पहिला डोस घेतल्यानंतर 28 दिवसानंतर दुसरा डोस देण्यात येणार आहे. तसेच सध्या कोरोनाची पुन्हा लाट आली असल्याने नागरिकांनी तात्काळ ही लस घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे. ही लस घेतल्यानंतर कोरोना होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे तसेच लसीकरणाबाबतही कोणीही गैरसमज करून घेऊ नये असेही त्यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यात शुक्रवारचे लसीकरण

केंद्र              रूग्ण
उपकेंद्र                 9997
प्राथमिक केंद्र      2632
ग्रामीण रूग्णालय   1260
मनपा-खासगी      2068
एकूण                  15,957

Related Stories

सांगली : नळाचे पाणी बंद केल्याने कुटुंबाला मारहाण

Abhijeet Shinde

आळसंद येथे प्राथमिक आरोग्य केंद्रास मंजुरी

Abhijeet Shinde

सांगलीच्या स्टेशन चौकात पत्रकार दिन साजरा

Abhijeet Shinde

महाराष्ट्र धनगर समाज महासंघाची २ डिसेंबरला धुळ्यात राज्यव्यापी बैठक

Abhijeet Shinde

खड्डेमुक्त मिरज शहरासाठी आम आदमीच्या कार्यकर्त्यांचे श्रमदान

Abhijeet Shinde

सांगली : मिरजेत डॉक्टराचा बंगला कामगारानेच फोडला

Abhijeet Shinde
error: Content is protected !!