तरुण भारत

मंगळवारपेठेत जनावरे दगावण्याचा प्रकार सुरूच

शुक्रवारी आणखी एक म्हैस दगावली : एकूण 14 जनावरे मृत्युमुखी, गवळी कुटुंबीय संकटात : अंदाजे लाखाचे नुकसान

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

मंगळवारपेठ टिळकवाडी येथील गवळी कुटुंबीयांची जनावरे दगावण्याचा प्रकार अद्याप सुरूच आहे. शुक्रवारी आणखी एक जातिवंत दुभती म्हैस दगावल्याने या कुटुंबीयांवर मोठे संकट ओढवले आहे.

 गेल्या पंधरा दिवसांत काही दिवसांच्या अंतराने या कुटुंबीयांची जनावरे दगावत आहेत. गोठय़ातील जातिवंत तब्बल 14 जनावरे मृत्युमुखी पडल्याने निम्मा गोठा खाली झाला आहे. शिवाय या प्रकारामुळे गवळी बांधवांत खळबळ माजली आहे. दरम्यान गोठय़ातील इतर जनावरांना संसर्गापासून लांब ठेवण्याचे आव्हान पशुसंगोपन खात्याचे अधिकारी व गवळी कुटुंबीयांसमोर आहे. पशुसंगोपन खात्याने दगावलेल्या जनावरांचा पाठपुरावा करून भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी होत आहे.

या गवळी कुटुंबीयांचा जनावरांपासून मिळणाऱया दुधावरच उदरनिर्वाह चालतो. मात्र दुभत्या म्हशीच मृत्युमुखी पडल्याने कुटुंबीयांसमोर उदरनिर्वाहाचे मोठे संकट उभे ठाकले आहे. जातिवंत म्हशींची किंमत 80 हजार ते 1 लाखापर्यंत आहे. या गवळी कुटुंबीयांच्या 14 म्हशी दगाविल्याने त्यांना 15 लाखांहून अधिक फटका बसला आहे. दगावलेल्या जनावरांचे रक्ताचे नमुने घेऊन पशुवैद्यकीय खात्याच्या अधिकाऱयांनी ‘मॅलिगंट कटरल फिव्हर’ हा आजार झाल्याचे स्पष्ट केले आहे.

शेळय़ा-मेंढय़ांपासून आजार

दरम्यान, हा आजार शेळय़ामेढय़ांपासून उद्भवतो. यावर कोणताही उपचार नाही.  काळजी म्हणून जनावरे एकमेकांपासून स्वतंत्र करणे व गोठा स्वच्छ ठेवणे अशा सूचना अधिकाऱयांनी केल्या होत्या. दरम्यान गवळी कुटुंबीयांच्या घरी असलेली एक शेळी येळ्ळूरच्या व्यक्तीला विकत घ्यायला लावून त्या शेळीला इंजेक्शन देवून ठार मारण्यात आले. हा आजार इतर जनावरांना होऊ नये, याकरिता शेळीला दफन करण्यात आले.

या गवळी कुटुंबीयांच्या म्हशी वरचेवर दगावत असून गोठय़ातील इतर जनावरांना हा आजार होणार नाही. यासाठी खबरदारी घ्यावी, अशी मागणी होत आहे.

Related Stories

आराधना शाळेत कनकदास जयंती साजरी

Amit Kulkarni

जिल्हय़ात ब्लॅक फंगसची रुग्णसंख्या 43

Amit Kulkarni

शुभम शेळके यांच्या प्रचारात खानापूर म.ए.समितीचा सहभाग

Amit Kulkarni

खानापूर रोडवरील कुंटणखान्यावर धाड

Patil_p

एनसीसी विद्यार्थ्यांच्या ट्रेकचा सांगता समारंभ

Amit Kulkarni

निपाणीत पुन्हा चोरटय़ांचा उच्छाद

Patil_p
error: Content is protected !!