तरुण भारत

“मी बंडखोर नाही, मी एकनिष्ठ आहे ” : मंत्री ईश्वरप्पा

बेंगळूर/प्रतिनिधी

ग्रामविकास व पंचायत राजमंत्री (आरडीपीआर) के एस ईश्वरप्पा यांनी, त्यांचे आणि मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांचे काही प्रकरणांमध्ये मतभेद आहेत पण आम्ही “एकत्रित पक्ष मजबूत करायचा” असा दावा केला,असल्याचे म्हंटले. शुक्रवारी पत्रकार परिषदेत ईश्वरप्पा म्हणाले, “मी बंडखोर नाही. मी एकनिष्ठ आहे ”, असल्याचे म्हंटले.

“बरेच लोक येडियुराप्पांची दिशाभूल करीत आहेत. २०१२ मध्ये काही लोकांचे म्हणणे ऐकून त्यांनी भाजप पक्ष सोडून कर्नाटक जनता पक्षामध्ये (केजेपी) सामील झाले. केजेपीमध्ये दाखल झाल्यानंतर कोणीही येडियुरप्पाबरोबर नव्हते. तर, ते पुन्हा भाजपमध्ये सामील झाले. त्यावेळी आमच्या दोघांमध्येही वाद होते, ” असे ते म्हणाले.

ईश्वर्वरप्पा यांनी आपण वारंवार पत्र देऊनही कोणताही निधी जाहीर करण्यात आला नाही, असे म्हणत त्यांनी ‘स्वाक्षर्‍याची काळजी करू नका’ आपण आहोत असे ते म्हणाले.

राज्यपालांनी आणि पक्षाच्या उच्च कमांडकडे हा मुद्दा उपस्थित करण्यासाठी काही भाजप आमदार आणि मंत्र्यांनी सुरू केलेल्या स्वाक्षरी मोहिमेची आपल्याला पर्वा नाही, असे ईश्वरप्पा म्हणाले. “मला काळजी नाही. या मोहिमेतील एक भाग असलेले काही आमदार यांनी मला दूरध्वनी करून सांगितले की काही कारणांमुळे ते यात सहभागी झाले आहेत. ”

“प्रचारात सहभागी असलेले आमदार, मंत्री आणि खासदार हेदेखील भाजपचे आहेत आणि आम्ही एकत्र काम करू. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीनंतर हा विषय सुटला जाईल. अनेकांनी माझ्या या निर्णयाचे समर्थन केले आहे आणि मला पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले आहे, असे ते म्हणाले.

येडियुरप्पा यांनी राजीनामा द्यावा किंवा त्यांनी ईश्वरप्पा यांना मंत्रिमंडळातून काढून टाकले पाहिजे, अशा केपीसीसी अध्यक्ष डी. शिवकुमार यांच्या विधानाचा संदर्भ देताना ते म्हणाले, “मी आणि येडियुरप्पा एक आहोत आणि प्रक्रिया व नियम पाळण्याचा माझा हेतू आहे. आम्ही एकत्र काम करू आणि एकत्र सरकार चालवू ”. अत्यामुळे कोणी काहीही बोलूदेत आम्ही पक्ष वाढीसाठी एकत्र काम करणार आहोत.

Advertisements

Related Stories

कर्नाटकात २४ तासात ७,५७१ नवीन कोरोना रुग्ण

Abhijeet Shinde

कर्नाटकः २० जानेवारीला काँग्रेसचे ‘राजभवन चलो’ आंदोलन

Abhijeet Shinde

राज्यात कोरोना रुग्णांची वाढ सुरूच

Abhijeet Shinde

कर्नाटकात नवीन कोरोना रुग्णसंख्येत घट

Abhijeet Shinde

कर्नाटक : जलद चाचण्यांची संख्या वाढणार

Abhijeet Shinde

कर्नाटकातील २२ जिल्ह्यात शहरापेक्षा ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या जास्त

Abhijeet Shinde
error: Content is protected !!