तरुण भारत

अविश्वास ठराव आणण्यात आमदारांची भूमिका नाही

प्रतिनिधी/ कुडचडे

कुडचडे-काकोडा पालिकेच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीनंतर निवडून आलेल्या नवीन नगराध्यक्षांवर आणलेला जो अविश्वास ठराव पणजीतील पालिका संचालक कार्यालयात सादर करण्यात आला आहे त्यात स्थानिक आमदारांची कोणतीच भूमिका नसून तो निर्णय आम्हा दहा जणांच्या पॅनलने घेतलेला आहे. सदर अविश्वास ठरावावर आपण तसेच प्रमोद नाईक, रूचा वस्त, रिमा एलाईस, योलोंडा पेरेरा, टोनी कुतिन्हो, दामोदर भेंडे, कार्मेलिना मोराईस, विश्वास सावंत, सुशांत नाईक यांनी कोणताच दबाव नसताना सही केलेली आहे, अशी माहिती नगरसेविका जस्मिन ब्रागांझा यांनी दिली आहे.

Advertisements

कुडचडे पालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीवेळी अधिकाऱयांनी सांगितलेल्या मतदानाच्या अटी ऐकण्यात चूक झाल्याने चुकीचे मतदान होऊन वेगळा उमेदवार नगराध्यक्ष म्हणून निवडून आला. त्यामुळे दहा नगरसेवकांनी सदर निवडून आलेल्या नगराध्यक्षावर अविश्वास ठराव आणला आहे. यात आमदारांची कोणतीच भूमिका नाही, असे यावेळी सांगण्यात आले. कुडचडे येथील भाजप कार्यालयात घेतलेल्या या पत्रकार परिषदेस ब्रागांझा यांच्यासह दहापैकी नऊ नगरसेवक हजर होते. त्यात प्रमोद नाईक, रूचा वस्त, रिमा एलाईस, योलोंडा पेरेरा, टोनी कुतिन्हो, दामोदर भेंडे, कार्मेलिना मोराईस व विश्वास सावंत उपस्थित होते.

ज्यावेळी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली त्यावेळी निवडणूक अधिकाऱयांनी मतदान करण्यासंबंधी ज्या अटी सांगितल्या त्या नवीन नगरसेवकांना बहुतेक समजल्या नसाव्यात. त्यामुळे सदर चुकीचे मतदान झाले आहे. कारण निवडणुकीच्या आधी घेतलेल्या बैठकीत सर्वांचा निर्णय समान होता. मग निवडणूक घेतलेल्या ठिकाणी गेल्यावर तो कसा बदलू शकतो. निवडणूक झाल्यावर या मुद्यावर परत घेतलेल्या बैठकीत हे उघड झाले व त्याची दखल घेत आम्ही दहा जणांनी मिळून सदर अविश्वास ठराव आणण्याचा निर्णय घेतला. यात स्थानिक आमदार असलेले वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी कसलाच हस्तक्षेप केलेला नाही, असे ब्रागांझा यांनी स्पष्ट केले.

आपण आधीपासूनच या पॅनलच्या बरोबर राहिलेले आहे. त्यामुळे आपल्या पॅनलमधील उमेदवार नगराध्यक्षपदी निवडून न आल्याने आपण उपनगराध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे, असे नगरसेविका रूचा वस्त यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी उपस्थित असलेल्या सर्व नगरसेवकांनी त्यांच्यावर कोणताच दबाव आलेला असून दबावाविना हा निर्णय घेतलेला असल्याचे स्पष्ट केले.

Related Stories

ज्याने चूक केली, त्यानेच ती निस्तरावी

Amit Kulkarni

काजार, वाढदिवस, स्थानिकासाठी निर्बंध घालून मद्यालये खुली करा

Omkar B

मगो पक्षाच्या केंद्रीय समितीच्या निवडणूकीत निलेश पटेकार यांना निवडून द्या- लवू मामलेदार

Amit Kulkarni

कोरोना ओसरतोय, तरीही गोवा गाफील नाही

Patil_p

केंद्रीय सशक्तीकरण समितीने दिलेल्या अहवालाचे गोवा फॉरवर्डकडून स्वागत

Amit Kulkarni

कवळे येथे घरावर झाड कोसळून हानी

Omkar B
error: Content is protected !!