तरुण भारत

पंचायतींची पाटी अद्याप कोरीच

पाच पालिकांसाठी तीन दिवसांत 58 अर्ज

प्रतिनिधी/ पणजी

Advertisements

राज्यातील पाच पालिकांच्या निवडणुकीसाठी दाखल करण्यात आलेल्या अर्जांच्या पारडय़ात तिसऱया दिवशी 22 अर्जांची भर पडत एकूण संख्या 58 वर पोहोचली आहे. दुसऱया बाजूने याच दरम्यान होणाऱया दोन ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीसाठी एकही इच्छुक पुढे आलेला नसल्याने पंचायतीची पाटी कोरीच राहिली आहे.

दि. 23 एप्रिल रोजी राज्यातील म्हापसा, मडगाव, मुरगाव, सांगे आणि केपे या पाच पालिका आणि सर्वण कारापूर व वेळ्ळी या दोन ग्रामपंचायतींच्या प्रत्येकी एका प्रभागासाठी निवडणूक होणार आहे. त्यासाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 31 मार्च पासून प्रारंभ झाली आहे. त्यात पालिकांसाठी पहिल्या दिवशी 10 अर्ज दाखल झाले होते. दुसऱया दिवशी त्यात 26 अर्जांची भर पडली व काल दि. 3 एप्रिल रोजी आणखी 22 जणांनी अर्ज दाखल केले. त्यामुळे एकूण अर्जसंख्या 58 एवढी झाली. मात्र दोन पंचायतींच्या पोटनिवडणुकीसाठी अद्याप एकाही इच्छुकाने अर्ज दाखल केलेला नाही.

अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 8 एप्रिलपर्यंत चालणार आहे. त्यामुळे इच्छुकांना अजूनही बराच मोठा कालावधी मिळणार आहे. सोमवार ते गुरुवार या पुढील चार दिवसात अजूनही बरेच उमेदवार पुढे येण्याची शक्यता असून त्याच दरम्यान पंचायतींसाठीही अर्ज दाखल हेण्याची शक्यता आहे.

दि. 9 एप्रिल रोजी छाननी होणार आहे. 10 रोजी अर्ज मागे घेण्यात येतील व त्याच दिवशी अंतिम यादी जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतरचे दिवस प्रचारासाठी असतील व दि. 23 रोजी निवडणूक होणार आहे. दि. 26 रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येतील.

Related Stories

काँग्रेसचा वनखात्याच्या कार्यालयाला घेराव

Patil_p

‘आप’च्या आमदार आतिशी गोव्यात दाखल

Omkar B

वीज खात्याच्या सर्व सेवा आता ऑनलाईन

Patil_p

मित्रानेच केला मित्राचा खून

Patil_p

जीव्हीएम महाविद्यालयातर्फे फोंडय़ात 7 पासून क्रीडा विषयक राष्ट्रीय परीसंवाद

Patil_p

म्हापशात कोरोनावरील खास लसीचा प्रयोग यशस्वी

Amit Kulkarni
error: Content is protected !!