तरुण भारत

फसवे अंदाजपत्रक मुख्यमंत्र्यांकडून सादर

वार्ताहर/ मडकई

 विधानसभेत मांडत असलेल्या अंदाजपत्रकाची अंमलबजावणी सरकारकडून व्यवस्थित होत नसून ते फक्त दिखावूपणासाठीच सादर केले जात असल्याची टीका आमदार सुदिन ढवळीकर यांनी पत्रकार परिषदेतून केली.

Advertisements

रुपया येतो कसा व जातो कसा हे गेली अनेक वर्षे अंदाजपत्रकातून दाखविण्यात येत होते. मात्र गेली दोन वर्षे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी हा रुपयाच गायब करून जनतेच्या तोंडाला पाने पुसलेली आहेत, अशी टीकाही सुदिन ढवळीकर यांनी केली. ताळतंत्र नसलेल्या या अंदाजपत्रकावर हसावे की रडावे तेच कळत नाही. तळागाळातल्या जनसामान्यांचा संबंध येणाऱया सरकारच्या आरोग्य, कृषी, मत्स्य, जलस्रोत, वाहतूक, समाज कल्याण, सिव्हिल सप्लाय, पंचायत, नगरपालिका अशा अनेक खात्यासंबंधी आपले विधानसभेत लक्ष्यवेधी सूचनेच्या तासाला प्रश्न होते. परंतु ही विधानसभा जुलै महिन्यापर्यंत पुढे ढकलल्याने ते तसेच पडून राहिलेले आहेत. त्यातील काही प्रश्न आपण मांडले, पण समाधानकारक उत्तरे देण्यास सरकारला अपयश आलेले आहे. जनसामान्यांशी संबंध येणाऱया या खात्याचे भांडवल व महसूल याची अर्थ खात्याकडून मिळालेली टक्केवारीची जंत्रीच आमदार  ढवळीकर यांनी पत्रकार परिषदेतून मांडली. प्रत्येक खात्यावर भाष्य करताना त्यांनी त्या खात्याची शस्त्रक्रिया केली. हे सर्व प्रकार पाहिल्यास एकतर मंत्री यावर कामच करीत नाही अथवा सरकारकडे पैसेचे नसल्याचे सिद्ध होते, असा आरोप आमदार  ढवळीकर यांनी केला.

               मुंबईतील गोवा सदन सुरू करण्याची मागणी

 मुंबईत असलेले गोवा सदन दुरुस्तीसाठी गेली 7 वर्षे बंदच असल्याने गोव्यातील जनतेची गैरसोय होत आहे. माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांच्या कारकिर्दीत हे भवन उभारण्यात आले होते. त्याचा फायदा गोव्यातील गरजू जनतेला होत होता. टाटा व अन्य इस्पितळात जाणाऱयांसाठी हे अत्यंत उपयुक्त ठरत होते. विश्व हिंदू परिषदेतर्पे सोय केलेली असली तरी ती अपूरी पडत असल्याने आपण सरकारला हे गोवा सदन खुले करण्यासाठी विनंती केली असल्याचे आमदार श्री ढवळीकर यांनी सांगितले.

Related Stories

रुग्णवाहिकेतच महिलेची प्रसुती : जुळय़ांना जन्म

Omkar B

मोपा ‘लिंक हायवे’ विरोधकांना अटक

Amit Kulkarni

पावसाच्या संततधारामुळे पेडणेत जनजीवन विस्कळीत

Omkar B

वळवई गजान्तलक्ष्मीचा उद्या जत्रोत्सव

Patil_p

नुवे येथे लसीकरण केंद्राची व्यवस्था

Amit Kulkarni

डिचोलीवासीय ‘नवा सोमवार’ उत्सवासाठी सज्ज

Amit Kulkarni
error: Content is protected !!