तरुण भारत

देशात 93,249 नव्या बाधितांची नोंद

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

देशात मागील 24 तासात 93 हजार 249 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 513 रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1 कोटी 24 लाख 85 हजार 509 वर पोहचली असून, मृतांची एकूण संख्या 1 लाख 64 हजार 623 एवढी आहे. 

शनिवारी 60,048 रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत 1 कोटी 16 लाख 29 हजार 289 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत. सध्या 6 लाख 91 हजार 597 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील 7 कोटी 59 लाख 79 हजार 651 जणांना लसीकरण करण्यात आले. 

देशात आतापर्यंत 24 कोटी 81 लाख 25 हजार 908 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामधील 11 लाख 66 हजार 716 कोरोना चाचण्या शनिवारी (दि.03) करण्यात आल्या.

Related Stories

‘कोविफोर’ पोहचले देशातील पाच राज्यात

datta jadhav

सर्व भारतीय हिंदूच

Patil_p

कोळसा उद्योगातील सुधारणांसाठी 50 हजार कोटी

datta jadhav

संयुक्त राष्ट्रसंघाने नाक खुपसले

tarunbharat

चीनी सीमेवर सैन्य विनाशस्त्र कोणी आणि का पाठवले? : राहुल गांधींचा सवाल

pradnya p

गोव्याच्या माजी राज्यपाल मृदुला सिन्हा यांचे निधन

Omkar B
error: Content is protected !!