तरुण भारत

कृषीमंत्री पाटील यांनी सिध्दरामय्यांवर साधला निशाणा

बेंगळूर/प्रतिनिधी

कृषीमंत्री बी.सी. पाटील यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या आरोपाचे खंडन करत, केंद्र व राज्य सरकारने शेतकरी व सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत हे त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे, असे म्हणाले.

कृषीमंत्री म्हणाले की प्रत्येक सरकार केवळ शासनास प्राप्त झालेल्या महसुलातून विकास योजना राबवते. कोणताही नेता आपल्या वडिलोपार्जित मालमत्तेतून अशा योजना चालवित नाही. सिद्धरामय्या यांच्या अण्णाभाग्य योजनेचे वैयक्तिकरित्या क्रेडिट घेणे योग्य नाही. या योजनेंतर्गत ७ किलो तांदूळ वाटप केल्याचा विरोधी पक्षनेत्याचा दावा खोटा आहे.

दरम्यान किसान सन्मान योजनेंतर्गत केंद्र व राज्य सरकार १ कोटीहून अधिक शेतकर्‍यांच्या खात्यात निधी जमा करीत आहेत? ही कल्याणकारी योजना नाही का? कोरोना साथीच्या काळात केंद्र आणि राज्य सरकारने सामान्य लोकांना मदत केली नाही का? किमान आधारभूत किंमतीवर कृषी उत्पादने खरेदी केली जात नाहीत? केवळ २ किलो तांदळाच्या कपातीवरून सरकारला घेराव घालणे योग्य नाही, असे ते म्हणाले.

Advertisements

Related Stories

नऊ महिन्यात परिवहनला 500 कोटींचा फटका

Patil_p

कर्नाटक: खासगी शाळांना फी कमी करण्याचा प्रस्ताव

Abhijeet Shinde

कर्नाटक: राज्यात ९४ हजाराहून अधिक जणांची तपासणी

Abhijeet Shinde

कर्नाटक: नेत्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन केलेच पाहिजे: माजी उपमुख्यमंत्री जी. परमेश्वर

Abhijeet Shinde

बेंगळूर: कोरोनामुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांची संपूर्ण फी माफ : एमएएचई

Abhijeet Shinde

भाजपचे एम. के. प्राणेश विधानपरिषदेचे नवे उपसभापती

Amit Kulkarni
error: Content is protected !!