तरुण भारत

‘मेजर’ चित्रपटाचा फर्स्ट लुक

26/11 दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेले मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या जीवनावर आधारित चित्रपट ‘मेजर’ प्रदर्शनापूर्वी चर्चेत आहे. चित्रपटाच्या पोस्टरपासून टीजरदेखील मोठी प्रसिद्धी मिळवत आहे. चित्रपटात सई मांजरेकर झळकणार आहे.

शाळेचा गणवेश परिधान केलेल्या अदिवी शेषच्या बाजूला बसून त्याला प्रेमाने न्याहाळताना सई या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये दिसून येत आहे. चित्रपटाचा टीजर 12 एप्रिल रोजी प्रदर्शित केला जाणार आहे.

Advertisements

चित्रपटात सई 16 वर्षीय मुलीपासुन 28 वर्षांच्या महिलेपर्यंतची भूमिका साकारत आहे. मेजर चित्रपट हिंदी आणि तेलगू भाषेत तयार केला जात आहे. याचमुळे सईने तेलगू भाषेचे धडे घेतले आहे. चित्रपटात अभिनेता अदिवी शेष हा मेजर उन्नीकृष्णन यांची व्यक्तिरेखा साकारणार आहे. हा चित्रपट 2 जुलै रोजी प्रदर्शित केला जाईल. शशी किरण टिक्का यांनी याचे दिग्दर्शन केले आहे. तर सोनी पिक्चर फिल्म्स इंडियाकडून याची निर्मिती करण्यात येत आहे.

Related Stories

अभिनेता आफताब शिवदासानी कोरोना पॉझिटिव्ह

Rohan_P

अभिनेता अर्जुन रामपालला एनसीबीकडून पुन्हा समन्स

Rohan_P

किचनपासून मुख्यमंत्री होण्यापर्यंतचा प्रवास

Patil_p

बिग बॉसची उत्सुकता संपली

Patil_p

‘कबीर सिंग’ सिनेमातील अभिनेत्री निकिता दत्तला कोरोनाची लागण

Rohan_P

या आठवडय़ात

Patil_p
error: Content is protected !!