तरुण भारत

सातारा : वराडे येथील अपघातात बेलवडे हवेलीतील तरुण ठार

प्रतिनिधी / उंब्रज

आशियाई महामार्गावर वराडे (ता. कराड) गावच्या हद्दीत रस्ता ओलांडणाऱ्या युवकास आयशर टेम्पोने जोराची धडक दिल्याने युवक जागीच ठार झाल्याची घटना रविवार ४ रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडली. प्रशांत तानाजी सूर्यवंशी (वय २८, बेलवडे हवेली ता. कराड) असे अपघात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे.

याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, बेलवडे हवेली येथील प्रशांत सूर्यवंशी हा कामानिमित्त वराडे येथे आला होता. महामार्गावर वराडे येथील एवन ढाब्यासमोर रस्ता ओलांडत असताना कराड ते पुणे लेणेवरुन भरधाव वेगाने जाणाऱ्या आयशर टेम्पोंने जोराची धडक दिली. या धडकेत प्रशांत सूर्यवंशी गंभीर जखमी होऊन ठार झाला आहे.त्यास उपचारासाठी उंब्रजमधील शारदा क्लिनिक येथे नेण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच तो मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. प्रशांत हा बेलवडे हवेली येथे मामाच्या घरी लहानपणापासून वास्तवास असून तो सलून व्यावसायिक म्हणून काम करतो.सदर अपघाताची नोंद रात्री उशिरापर्यंत तळबीड पोलीस ठाण्यात झाली नव्हती.

Advertisements

Related Stories

भाजी विक्रेत्यावर पोलीसांची कारवाई

Patil_p

सातारा : शाहूपुरीतील मिरचीच्या गोदामाला आग

datta jadhav

बनावट सोने विकणाऱया टोळीचा पोलिसावर हल्ला

Amit Kulkarni

‘मंदिरे खुली करण्याबाबत घेतलेला निर्णय कदाचित योगायोग’

triratna

रानमेवा बाजारपेठेत दाखल

Patil_p

शिवाजी सोसायटीच्या उद्यानात सीसीटीव्ही यंत्रणेचे उद्घाटन

Amit Kulkarni
error: Content is protected !!