तरुण भारत

कोरोनाचे संकट गडद; 24 तासात 1 लाखांहून अधिक बाधित

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

देशात कोरोनाचे संकट आणखी गडद होत असल्याचे रविवारच्या आकडेवारीवरून दिसून येते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील ही विक्रमी रुग्णवाढ असून, पहिल्या लाटेत 16 सप्टेंबर 2020 रोजी एका दिवसातील बधितांची संख्या एक लाखाच्यासमीप पोहचली होती. दरम्यान, मागील 24 तासात देशात 1 लाख 03 हजार 558 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 478 रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1 कोटी 25 लाख 89 हजार 067 वर पोहचली असून, मृतांची एकूण संख्या 1 लाख 65 हजार 101 एवढी आहे. 

रविवारी 52,847 रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत 1 कोटी 16 लाख 82 हजार 136 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत. सध्या 7 लाख 41 हजार 830 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील 7 कोटी 91 लाख 05 हजार 163 जणांना लसीकरण करण्यात आले. 

देशात आतापर्यंत 24 कोटी 90 लाख 19 हजार 657 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामधील 08 लाख 93 हजार 749 कोरोना चाचण्या रविवारी (दि.04) करण्यात आल्या.

Related Stories

दूरसंचार यंत्रणा होणार अधिक गतिमान

Patil_p

चीनने २०० पेक्षा जास्त रणगाडे घेतले मागे

Shankar_P

आंतरराष्ट्रीय स्कुल डिझाइन स्पर्धेत वाझे-नाईक-मुल्ला यांना मिळाला तिसरा क्रमांक

Shankar_P

राजस्थानमध्ये 772 नवे कोरोना रुग्ण

pradnya p

150 देशांचा जीडीपी ‘आत्मनिर्भर’ पॅकेजपेक्षा कमी

Patil_p

रूग्णाच्या डिस्चार्ज नियमावलीत बदल

Patil_p
error: Content is protected !!