तरुण भारत

बेळगावात प्रचाराला रंग भरू लागला

शुभम शेळके, मंगला अंगडी, सतीश जारकीहोळी यांच्याकडून मतदारांच्या गाठीभेटी : उमेदवारांना निवडून येण्याचा विश्वास

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीची तारीख जसजशी जवळ येत आहे तसतसा प्रचाराला रंग भरू लागला आहे. रविवारी साप्ताहिक सुटी असल्याने नोकरदार तसेच व्यावसायिक घरीच असल्याने सकाळपासून प्रचाराला सुरुवात करण्यात आली. उमेदवारांनी कॉर्नर सभांसोबतच घरोघरी जाऊन प्रचारास सुरुवात केली आहे. रविवारी दिवसभरात बेळगाव शहर व ग्रामीण भागात म. ए. समिती, काँग्रेस व भाजपने जोरदार प्रचार केला. विजयाचा गुलाल आम्हीच उधळणार असा विश्वास उमेदवारांकडून व्यक्त केला जात होता.

शुभम शेळके यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांच्या रामलिंगखिंड गल्ली येथील रंगूबाई भोसले पॅलेस येथे रविवारी प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, माजी आमदार मनोहर किणेकर, सरचिटणीस मालोजी अष्टेकर, महिला आघाडीच्या अध्यक्षा रेणु किल्लेकर, माजी महापौर सरिता पाटील, जि. पं. सदस्या सरस्वती पाटील, माजी नगरसेवक नेताजी जाधव यांच्या उपस्थितीत मध्यवर्ती कार्यालयाचा उद्घाटन सोहळा पार पडला.

शुभम शेळके यांनी रविवारी सकाळी तालुक्मयाच्या पूर्व भागातील निलजी व मुतगा या भागात झंझावाती प्रचार केला. गावातून भव्य प्रचारफेरी काढण्यात आली. यामध्ये युवकांचा समावेश मोठय़ा प्रमाणात दिसून आला. सायंकाळी गांधीनगर व शहराच्या इतर भागात प्रचार करण्यात आला. सिंह चिन्हासमोरील बटन दाबून मराठी भाषा व अस्मितेसाठी मतदान करण्याचे आवाहन शुभम शेळके यांनी मतदारांना केले.

भाजपचा उत्तर मतदारसंघात प्रचार

भाजपच्या उमेदवार मंगला अंगडी यांच्या प्रचारार्थ रविवारी विविध ठिकाणी प्रचारसभा घेण्यात आल्या. बेळगाव उत्तर मतदार संघातील धर्मनाथ भवन येथे सभा घेण्यात आली. यावेळी राज्याचे उद्योगमंत्री जगदीश शेट्टर, अन्न व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती, राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी, आमदार अनिल बेनके, बेळगाव भाजप ग्रामीण अध्यक्ष संजय पाटील, राज्य जनरल सेपेटरी महेश टेंगिनकाई, उत्तरचे भाजपा अध्यक्ष पांडुरंग धामणेकर यांच्यासह नेत्यांनी या सभेत मार्गदर्शन करत मंगला अंगडी यांना भरघोस मतांनी निवडून आणण्याचे आवाहन केले.

बेळगाव महानगर व ग्रामीण मंडळ रयत सभा यांची संयुक्त सभा पार पडली. राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी व जगदीश शेट्टर यांनी शेतकऱयांशी संवाद साधला. केंद्र व राज्य सरकारने शेतकऱयांसाठी अनेक उपक्रम राबवून त्यांच्या शेती मालाला योग्य भाव देण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले. येत्या निवडणुकीत भाजप उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी राज्य उपाध्यक्ष दुदाप्पा भेंडवाडे, शेखर कुलकर्णी, प्रदीप सानिकोप यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

सतीश जारकीहोळी यांचा धामणे-येळ्ळूर परिसरात प्रचार

काँग्रेसचे उमेदवार सतीश जारकीहोळी यांनी रविवारी बेळगाव दक्षिण भाग पिंजून काढला. त्यांनी येळ्ळूर, धामणे, मच्छे परिसरात प्रचार केला. येळ्ळूर येथे घेण्यात आलेल्या सभेत रमेश गोरल यांनी सतीश जारकीहोळी हे मोठय़ा मताधिक्क्मयाने निवडून येतील, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी माजी आमदार काका पाटील, वीरकुमार पाटील, लक्ष्मण चिंगळे, जि. पं. अध्यक्षा आशा ऐहोळे, उपाध्यक्षा अरुण कटांबळे, ग्रा. पं. सदस्य विलास बेडरे यांच्यासह मोठय़ा संख्येने नागरिक उपस्थित होते. येळ्ळूर व अवचारहट्टी येथे प्रचार करण्यात आला. धामणे येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात सभा पार पडली. शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून प्रचाराला सुरुवात झाली, खानापूरच्या आमदार अंजली निंबाळकर यांनी मतदारांना सतीश जारकीहोळी यांना मतदान करण्याचे आवाहन केले. यावेळी सतीश जारकीहोळी, जि. पं. सदस्य रमेश गोरल, ग्रा. पं. अध्यक्षा योगिता बेन्नाळकर, सदस्य मारुती मरगाण्णाचे, एम. के. पाटील, राजू बडिगेर, रवि बस्तवाडकर, अशोक पाटील, रामा सैबण्णावर, जोतिबा बाळेकुंद्री, राजू पाटील, श्रीमंतगौडा पाटील यांच्यासह धामणे, कुरबरहट्टी, मासगौंडहट्टी, देवगणहट्टी येथील नागरिक व युवक उपस्थित होते.

Related Stories

महिला आघाडी आयोजित स्पर्धांचा निकाल

Amit Kulkarni

धामणे-बस्तवाड रस्ता अर्धवटच

Amit Kulkarni

शहापुरात फुलला आठवडी बाजार

Patil_p

कंग्राळी खुर्द मसणाई देवीची यात्रा साधेपणाने साजरी

Patil_p

शब्दगंध कवी मंडळाची बैठक

Omkar B

पशुसंजीवनी योजनेंतर्गत पशुपालकांपर्यंत सुविधा पुरविणार

Omkar B
error: Content is protected !!