तरुण भारत

अभिनेता अक्षय कुमार रुग्णालयात दाखल

  • सोशल मीडियावर दिली होती कोरोना संसर्गाची माहिती


ऑनलाईन टीम / मुंबई : 


महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट झपाट्याने वाढत आहे. बॉलिवुडमध्ये देखील अनेक कलाकार या महामारीचे शिकार झाले आहेत. कालच्या दिवशीच अभिनेता अक्षय कुमारने सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वतःला कोरोनाची लागण झाली असून होम क्वारंटाइन राहणार असल्याचे सांगितले होते. 

Advertisements


मात्र, आज त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रकती बिघडल्यामुळे अक्षय कुमारला अचानक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अक्षय कुमारला मुंबईतील हिरानंदानी रुग्णालयात दाखलकरण्यात आले आहे. याबाबतची माहिती त्याने ट्विट करून दिली आहे. 


तो आपल्या ट्विटमध्ये म्हणाला की, आपण सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांमुळे मला चांगले वाटत आहे. पण काही मेडिकल कारणांमुळे मी रुग्णालयात दाखल होत आहे. लवकरच घरी परत येईन, असा विश्वास व्यक्त केला आहे. 

  • ‘राम सेतू’च्या सेटवरही 45 लोकांना कोरोना 


अक्षय कुमारच्या आगमी चित्रपट ‘राम सेतू’च्या सेटवरही 45 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. या चित्रपटासाठी काम करत असलेल्या 45 ज्यूनिअर आर्टिस्टच्या कोरोना चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. मुंबईच्या मढ आयलँड येथील ‘राम सेतू’च्या सेटवर सोमवारी म्हणजेच 5 एप्रिलला 100 लोकांची एक टीम पोहोचणार होती. पण त्याआधी अक्षय कुमार आणि निर्माता विक्रम मल्होत्रा यांनी सर्वांचीच कोरोना टेस्ट करण्याचा निर्णय घेतला. ज्यात अक्षय कुमारसह 100 पैकी 48 ज्यूनिअर आर्टिस्ट पॉझिटिव्ह आढळले आहेत. या सर्वांवर सध्या उपचार सुरू असून त्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.

Related Stories

सुख म्हणजे नक्की काय असतंमधील गौरीला मिळाले खास गिफ्ट

Patil_p

व्यक्तिगत आयुष्यात मी स्वतंत्र आहे

Patil_p

‘अरण्यक’ सीरिजमध्ये रवीना टंडन

Patil_p

17 डिसेंबरला बसणार ‘फ्री हिट दणका’

Patil_p

पहिला लष्करी ऍक्शन मराठी चित्रपट लवकरच भेटीला

Patil_p

आश्लेषा ठाकूरला येताहेत विवाहाचे प्रस्ताव

Patil_p
error: Content is protected !!