तरुण भारत

थॉम्पसनचे एअर कुलर बाजारात

बाजारात 15 टक्के वाटा हस्तगत करणार- उन्हाळय़ासाठी खास उत्पादने सादर

 मुंबई

Advertisements

 इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील कंपनी थॉम्पसनने आता एअर कुलर उत्पादने आणण्याचे निश्चित केले आहे. या अंतर्गत भारतात एअर कुलरचे सादरीकरण केले जाणार असून येणाऱया 2 वर्षांमध्ये बाजारात 15 टक्के इतका वाटा काबीज करण्याची योजना थॉम्पसन कंपनीने आखली आहे.

थॉम्पसनचा एअर कुलर 5,999 रुपयापासून सुरु होणार असून यामध्ये डेझर्ट कुलर्सची किंमत 7,999 आणि 9,499 रुपये इतकी असणार आहे. थॉम्पसनचे  टीव्ही संच आणि वॉशिंग मशीन आधीपासूनच भारतामध्ये विक्रीला उपलब्ध आहेत. पुढील 2 वर्षाच्या कालावधीमध्ये कंपनीला भारतीय बाजारातील वाटा 15 टक्क्यांपर्यंत वाढवायचा आहे. उन्हाळय़ात कुलर्सची वाढती संख्या लक्षात घेऊन सध्याला एअर कुलरच्या माध्यमातून विक्रीवर जोर दिला जाणार आहे. बाजारातील वाटा काबीज करण्यासंदर्भातील योजना कंपनीने सविस्तरपणे आखली आहे. सदरच्या कंपनीची उत्पादने ई-कॉमर्स पोर्टल फ्लिपकार्टवरही विक्रीला उपलब्ध करण्यात आली आहेत. जून 2020 मध्ये थॉम्पसनने वॉशिंग मशीन्स भारतीय बाजारामध्ये उपलब्ध केली आहेत. आर्थिक वर्ष 2019 मध्ये टीव्ही संचाच्या माध्यमातून कंपनीने भारतामध्ये पुन्हा एकदा प्रवेश मिळवला आहे. ऑनलाइन एअर कुलरची बाजारपेठ 30 टक्के इतकी राहणार असून पुढील तीन वर्षाच्या काळामध्ये या गटामध्ये कंपनीला नंबर एकचे स्थान काबीज करायचे आहे. पुढील 2 वर्षाच्या काळामध्ये थॉम्पसनकडून एअर कुलरची विविध प्रकारातील उत्पादने सादर केली जाणार आहेत.

2650 कोटींची उलाढाल

भारतातील संघटित एअर कुलरच्या बाजारपेठेची उलाढाल 2650 कोटी रुपयांची आहे. दरवषी अंदाजे 32 लाख एअर कुलर्स विक्री होतात. एप्रिल आणि जूनच्या कालावधीमध्ये एअर कुलर्सची विक्री सर्वाधिक दिसून येते. बजाज इलेक्ट्रीकल, सिंफनी, हॅवेल्स, क्रॉम्प्टन ग्रीव्हज यांची एअर कुलर उत्पादने मोठय़ा प्रमाणात देशभरात विकली जातात.

Related Stories

टोयोटा किर्लोस्कर मोटरतर्फे लेजेंडर व्हेरियंट

Patil_p

भारती एअरटेलमध्ये गुंतवणुकीस ऍमेझॉन उत्सुक

Patil_p

साखर उत्पादनात वाढीचा टक्का कायम

Patil_p

‘गुगल पे’कडून ग्राहकांसाठी नवी योजना

Patil_p

भारतीय कंपन्यांचे पेटंटसाठी अर्ज सादर

Patil_p

स्टेट बँकेचे गृहकर्ज झाले स्वस्त

Patil_p
error: Content is protected !!