तरुण भारत

विवो एक्स 60 सिरीजच्या फोन्सची चलती

प्री-बुकिंगला मिळाला 200 टक्के प्रतिसाद- विवो एक्स 60, प्रो आणि  प्रो प्लसना मागणी

नवी दिल्ली

 विवोने अलीकडेच एक्स 60 अंतर्गत आणलेल्या स्मार्टफोन्सना भारतात ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असल्याचे दिसून आले आहे. भारतीय बाजारात ग्राहकांनी 200 टक्क्मयांपेक्षा जास्त आगाऊ बुकिंग सदरच्या फोनकरता केले असल्याचे समोर आले आहे.

 याआधी प्री-बुकिंगच्या संख्येचा विचार करता विवोने नवा विक्रम नोंदवला असल्याचे सांगण्यात येत आहे. 30 मार्च 2021 पर्यंत प्री-बुकिंगला ग्राहकांचा दणकेबाज प्रतिसाद मिळाला आहे. कंपनीने विवो एक्स 60, विवो एक्स 60 प्रो आणि विवो एक्स 60 प्रो प्लस या तीन स्मार्टफोन्सचे नुकतेच सादरीकरण केले होते. एक्स 50 सिरीजअंतर्गत मागच्या खेपेला दाखल केलेल्या स्मार्टफोन्सना जसा प्रतिसाद मिळाला होता त्याच्या तुलनेत या खेपेस बुकिंगला 200 टक्के इतका वाढीव भरघोस प्रतिसाद ग्राहकांनी नोंदवला आहे. कंपनीही अशा प्रकारच्या उत्साही बुकिंगमुळे सुखावून गेली आहे. सदरचे स्मार्टफोन्स 2 एप्रिलपासून विवो इंडियाच्या इ-स्टोअरवर ऍमेझॉन, फ्लिपकार्ट आणि इतर संकेतस्थळांवर तसेच भारतातील स्मार्टफोन स्टोअर्समध्येही विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत.

 विवो एक्स 60 8 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेज तसेच 12जीबी रॅम व 256 जीबी स्टोरेजसह सादर होणाऱया दोन स्मार्टफोन्सच्या किमती अनुक्रमे 37 हजार 990 रुपये, 41 हजार 990 रुपये इतक्या असणार आहेत. विवो एक्स 60 प्रो 12 जीबी रॅम व 256 जीबी स्टोरेजसह येणार असून त्याची किंमत 49 हजार 990 रुपये असणार आहे. सदरचे फोन मिडनाइट ब्लॅक आणि शिमर ब्ल्यू या रंगांमध्ये उपलब्ध होणार आहेत. या फोन्सना क्वॉलकॉम स्नॅपड्रगन 8 सिरीजची चिपसेट बसवलेली आहे.

Related Stories

रियलमीच्या मदतीने जिओ स्वस्त स्मार्टफोन्स आणणार

Patil_p

सॅमसंग गॅलेक्सी एम 11 चे सादरीकरण

tarunbharat

हॉनरचे लॅपटॉपसह 2 स्मार्टफोन्स सादर

Patil_p

भारती एअरटेलकडून अवादात 5 टक्के वाटा खरेदी

Omkar B

‘जिओ’ची जिओमार्ट वेबसाईट सुरू

Patil_p

भारतात एलजीचा रोटेटिंग स्क्रीनचा स्मार्टफोन सादर

Patil_p
error: Content is protected !!