तरुण भारत

प्राचीन तंत्रज्ञानामुळे बदलले चित्र

पुर्वजांनी तयार केलेले भूमिगत झरे केले जिवंत

कर्नाटकातील तुमकुरु जिल्हा कधीकाळी गंभीर जलसंकटाला सामोरा जात होता. पण पूर्वजांनी तयार केलेले शेकडो वर्षे जुने भूमिगत झरे (तलापरिगे) दुरुस्त करून येथील लोकांनी पाणीटंचाईच्या समस्येवर मात केली आहे. नीरकल्लु गावात 10 वर्षांच्या दुष्काळामुळे स्थिती अत्यंत बिकट झाली होती. पण 8 फूट लांब आणि 5 फूट रुंद छोटय़ा तलावात नेहमी पाणी असल्याचे पाहून आश्चर्य वाटायचे. याचा स्रोत शोधण्याचा प्रयत्न करत याकरता जलसंरक्षणक्षेत्रात काम करणाऱया तज्ञाला लोकांनी पाचारण केले. या पाण्याला संरक्षित करण्याची प्राचीन विधी तलापरिगे असल्याचे त्याने सांगितले.

Advertisements

याचा अर्थ भूमीतून बाहेर पडणारे झरे असा होतो. या भागातील जमीन खडकाळ आहे. जमिनीतील खडकांमध्ये पाणी जमा होत राहते. झुडुप वाढल्याने आणि सफाई न झाल्याने पाण्याचा भूमिगत स्रोत बंद होतो. ग्रामस्थांनी 5 लाख रुपये खर्च करत या भूमिगत झऱयाला पुन्हा जिवंत केले आहे. यादरम्यान त्यांना आणखी अनेक स्रोतांविषयी समजले आहे.

अनेक ठिकाणाहून पाणी मिळण्यास सुरुवात झाल्याने पेयजलापासून सिंचनापर्यंतची व्यवस्था करण्यात आली. पूर्वी 800-1000 फुट खोलीवर पाणी मिळायचे, पण भूमिगत झऱयाच्या आसपास 60 फुटांवरच पाणी मिळते. यापूर्वी गावातील 400 घरे पाण्यासाठी टँकरवर अवलंबून होती. मागील दोन वर्षांमध्ये चांगला पाऊस पडल्याने समोरील रामदेवर बेट्टा टेकडीवरील दगडांमधूनही पाणी वाहू लागले आहे.

2 हजार वर्षे जुने तंत्रज्ञान

येथील पूर्ण क्षेत्रात सुमारे 300 तलापरिगे जिवंत करण्यात आले आहेत. हे तंत्रज्ञान सुमारे 2 हजार वर्षे जुने असल्याचे मानले जाते. लेखी दस्तऐवज 16 व्या शतकापासून सापडतात. तलापरिगेच्या नजीकच गावे वसविली जात तसेच त्यांच्यानजीक मंदिरांची उभारणी व्हायची.

Related Stories

मी आजारी या केवळ अफवा, मी ठणठणीत बरा : अमित शहा

Rohan_P

भारतात 24 तासात साडेचौदा हजार नवीन कोरोना रुग्ण

datta jadhav

पेट्रोल-डिझेल दर आणखी कडाडले

Patil_p

5 व्या टप्प्यात 79 उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे

Patil_p

पंजाबमध्ये कोरोना बाधितांनी ओलांडला 2.51 लाखांचा टप्पा

Rohan_P

खुशखबर ! प्रिपेड ग्राहक रिचार्ज न‌ करताही मारू शकणार गप्पा

prashant_c
error: Content is protected !!